Share

धनंजय महाडिक यांची माघार? महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला

dhanjay mahadik

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सहाव्या जागेसाठी अद्याप ही चर्चा सुरू आहे.

भाजपने सहाव्या जागेवरील उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपसमोर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीचे मंत्री आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून भाजपने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीतील चुरस आणखीनच वाढली आहे. मात्र महाडिक माघार घेणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. यामुळे कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल.

दरम्यान, सहाव्या जागेवर आमचाच विजय असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आलेला असताना पक्षाकडून या जागेवरील उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेण्यात येतो का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.

तर दुसरीकडे कालपासून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपासून शिवसेनेकडून कोणत्याही परिस्थितीत सहाव्या जागेवर आमचाच उमेदवार निवडून येणार, असा दावा केला जात होता.

दरम्यान, बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र, भाजप तिसरी जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती सध्या मिळत आहे. त्यामुळं राज्यसभा निवडणुकीची चुरस आता आणखीच वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पुण्यातील व्हाईट हाऊस ईडीच्या ताब्यात; अभिनेत्री अँजेलिना जोलीने देखील केले होते यामध्ये शूटिंग
‘आता काश्मीर सोडल्याशिवाय पर्याय नाही’; कश्मीरी हिंदूंनी केली सामूहिक पलायनाची घोषणा
अखेर केकेच्या मृत्यूचे खरे कारण समोर आलेच; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
फक्त मॅगी, सेक्सची जास्त मागणी, डोक्यावर केस नाहीत, भारतात घटस्फोटाची धक्कादायक प्रकरणे

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now