Share

..त्यामुळे फडणवीस आणि नड्डा यांच्यात विसंवाद असल्याच स्पष्ट दिसून आलं; वाचा दिल्लीदरबारात नेमकं घडलं काय?

devendra fadanvis

काल राजकीय वर्तुळात आणखी एक भूकंप झाला राजभवनावर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली.

त्यामुळे सर्वांनाच आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला. यावरून भाजपमध्ये फडणवीस यांच्या पदावरून विसंवाद असल्याचं दिसून आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला फडणवीस उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी तयार नव्हते. पक्षादेश मानावा की मानू नये, अशी द्विधा मनस्थिती फडणवीस यांची झाली होती.

मात्र, त्यानंतर खुद्द पंतप्रधान मोदी यांनी फडणवीस यांना दोनवेळा फोन करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह केला असल्याची माहिती मिळत आहे. अन् अखेर पक्षादेश मान्य करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. खरं तर राज्याचं मुख्यमंत्रीपद फडणवीसांना हवं होतं.

मात्र नेतृत्वाने फडणवीसांना मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्यास सांगण्यात आलं. शिंदे यांना मुख्यमंत्री करून फडणवीस यांनी त्याग केल्याचं चित्रं निर्माण झालं असतं, असं बोललं जातं आहे. अचानक नेतृत्वाकडून फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं

मात्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतचा निर्णय घेण्याआधी भाजपने चर्चा केली नाही का? असा सवाल आता उपस्थित होतं आहे. तसेच यावरून भाजपमध्ये फडणवीस यांच्या पदावरून विसंवाद असल्याचं दिसून आलं आहे. फडणवीस यांना सरकारमध्ये सहभागी करून घेऊन सरकार स्थिर ठेवावं, अशी नेतृत्वाची भूमिका असल्याच बोललं जातं आहे.

फडणवीस या सरकारमध्ये नसतील तर हे सरकार स्थिर राहणार नाही, अशी भीती भाजप श्रेष्ठींना वाटत असावी. आणि यामुळे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकाराव यासाठी नेतृत्वाने त्यांना आग्रह केल्याच आता बोललं जातं आहे. तर दुसरीकडे शिंदे यांच्या बंडामागे भाजपाचा हात असल्याच वातावरण राज्यात निर्माण झालं होतं.

त्यामुळे शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं. हा निर्णय दिल्लीचा होता असं आता सांगितलं जातं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील अशी चर्चा होती. पण आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली. त्यामुळे फडणवीस यांची प्रतिमा त्यागशील अशी निर्माण झाली.

महत्त्वाच्या बातम्या
बातमी विद्यार्थ्यांसाठी! बारावीनंतर ‘हे’ कोर्सेस करा, नोकरीची १०० टक्के खात्री
आलिया-दीपिका नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे रणबीर कपूरची फेव्हरेट, म्हणाला, तिच्यासोबत रोमान्स…
‘त्या’ पत्राने घात केला अन् शिकारी स्वतःच जाळ्यात अडकला; वाचा फडणवीसांबद्दल नेमकं काय घडलं
KGF मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा भयानक अपघात, कारला ट्रकने दिली धडक, पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now