Share

“उद्धव ठाकरेंनी मद्यक्रांती घडवलीय, त्यांना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट-२ काढता येईल”

udhav thackeray

वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारनं मुभा दिली आहे.

तसेच हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावरच वायनरी चालत असल्याने निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयानंतर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ट्विट करत भातखळकर म्हणतात, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट -2 काढता येईल. त्यांनी महाराष्ट्रात मद्यक्रांती घडवली आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी येत्या काळात अफू आणि गांजाच्या शेतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.’

 

याचबरोबर श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही या निर्णयावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘वाईनला परवानगी देण्याचा निर्णय हा संतापजनक,’ असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘सरकारने वाइन सुरू करून जुगार लावलेला आहे. मला आर आर आबांची आठवण होते. आज ते असते तर हा वाईनचा निर्णय झाला नसता. तसेच सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी डान्सबार बंदी करण्याचा निर्णय घेतला होता असेही भिडे म्हणाले.

दरम्यान, ‘महाराष्ट्राने संपूर्ण देशाला देशपण आणि भवितव्य दिले आहे. त्यामुळे असा निर्णय घेणाऱ्या सरकारविरोधात सर्व संघटनांनी आता लढा उभारला पाहिजे. यासाठी मंत्रिमंडळाशी बोलून हा निर्णय मागे घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. अन्यथा राज्यपालांची भेट घेऊन राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचेही भिडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
महिन्याला १.७५ लाख कमावणाऱ्या युवा शेतकऱ्याने सांगितले गुपित, तरुणांना दिली शेती करण्याची प्रेरणा
प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पोटच्याच मुलीला जंगलात सोडले; आईच्या नावाला काळीमा फासणारी घटना
“शरद पवारांनी खूप सोसलं आहे त्यामुळे तरुण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका ते कधीही घेणार नाहीत”
पॉर्न स्टारचा खळबळजनक दावा, तीन टॉपच्या खेळाडूंसोबत घालवली रात्र; नंतर त्यांच्या पत्नींनी पाठवले ‘हे’ मेसेज

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now