Share

लक्षात ठेवा..! ‘…असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही,’ चित्रा वाघ यांच्या कोल्हापुरातील सभेवर दगडफेक

chitra wagh

सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रचारादरम्यान सत्ताधारी-विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. तसेच भाजपनं (BJP) कोल्हापूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

मात्र प्रचाराच्या रणधुमाळी आता मुद्यावरून गुद्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे, भाजपच्या रणरागिणी म्हणून ओळख असणाऱ्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या सभेत दगडफेक केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

वाचा नेमकं सभेत काय घडलं.. कोल्हापूर या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून या ठिकाणी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे सध्या कोल्हापूर पोटनिवडणूक चर्चेचा विषय बनली आहे.

रविवारी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ या भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आल्या असता त्यांच्या सभेवर दगडफेक झाल्याचा आरोप खळबळजनक त्यांनी केला आहे. शहरातील मुक्त सैनिक वसाहत येथील जाहीर सभेत हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी रीतसर फिर्याद नोंदवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सभा सुरु असताना काहीजणांनी त्यांच्या दगडफेक केली असंही त्या म्हणाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी ट्विटर करून याबद्दल माहिती दिली आहे. ट्विट करत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

https://twitter.com/ChitraKWagh/status/1510666075142205443?s=20&t=iiIYhoOsEIVr5t7QQAej7w

ट्विट करत त्या म्हणतात, ‘वा रे बहादुरांनो, समोर यायची हिंमत नाही म्हणून सभेत दगडे मारता का? असा सवाल त्यांनी ट्वीटद्वारे केला आहे. तसंच, ‘तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांना दाखवा असल्या थेऱ्यांना घाबरणारी चित्रा वाघ नाही’ असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
३५ लाख लोक उपासमारीने मेले तेव्हा शहाजहानने ताजमहाल बनवला; या गायकाने केला खुलासा
रशिया-युक्रेन युद्धात भारताने घेतलेला ‘हा’ निर्णय ठरला गेमचेंजर, अचानक लागल्या नेत्यांच्या रांगा
कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू, सेनेच्या वाघाने फोडली डरकाळी
पत्नीला नांदायला पाठवत नव्हती सासू; मध्यरात्री तरुणाने सासरवाडीत येऊन सासूसोबत केलं भयंकर कृत्य

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now