Share

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे तळपते सूर्य आहेत, पण त्यांचा प्रकाश मातोश्रीच्या बिळाबाहेर फार पडत नाही

Uddhav Thackeray : शिवसेनेत मोठे बंड घडून आल्यानंतर प्रथमच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत भाजप आणि गटप्रमुखांच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. त्याला शिंदेनी थेट दिल्लीतून प्रतिउत्तर दिले. मात्र भाजप नेत्यांनी पण आता उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे. अतुल भातखळकरांनी केलेल्या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

‘जनाबसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिम्मत असेल तर वांद्र्यात आमदार जिंकून दाखवावा, मग उड्या माराव्यात,’ असं म्हणत भातखळकरांनी ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच उद्धव ठाकरे म्हणाले होते, ‘मी इथं आलो तेव्हा पाहिलं, आमचे वडील जागेवरच आहेत ना, नाहीतर महाराष्ट्रात मुले पाळणारी टोळी फिरते. तशी बाप पळवणारी टोळी सक्रीय झाली आहे.’

उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भातखळकर म्हणाले, ‘शिवसैनिक गोंधळले असतील, टाळ्या पिटाव्यात की कपाळं बडवावं.’ अशा प्रकारे उद्धव ठाकरेंवर भातखळकरांनी सडकून टीका केली आहे.

पुढे बोलताना ‘सहाव्या क्रमांकाचा पक्ष आणि दस नंबरी नेता’ असा खोचक टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. ‘उद्धव ठाकरे तळपते सूर्य आहेत. पण त्यांचा प्रकाश मातोश्रीच्या बिळाबाहेर फार पडत नाही. त्यामुळे ते फार कमी बाहेर पडतात.’

‘त्यांची सत्ता असताना आपल्या मुलाची बेरोजगारी दूर करण्याचे कर्तृत्व गाजवले. राज्याची सत्ता गमावल्यानंतर आता महानगरपालिकेवरील सत्ता गमावण्याच्या भीतीने सध्या ते घणाघाती बरळतायेत,’ असा टोलाही भातखळकरांनी लगावला.

अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. याच भातखळकरांनी काही दिवस आधी संजय राऊत ज्या पत्राचाळ प्रकरणी अटक आहेत, त्याच प्रकरणाबाबत शरद पवार जबाबदार असल्याचे म्हंटले होते.

महत्वाच्या बातम्या-
Udhhav thackeray : शिंदे गटाला भिडणाऱ्या शिवसैनिकांचे जेलमधून सुटताच मातोश्रीवर जल्लोषात स्वागत; ठाकरेंनी दिली शाबासकी
Uddhav Thakarey: उद्धव ठाकरे मेमन कुटुंबियांवर एवढे मेहेरबान का?, जनाब सेनेचा कांगावा उघड झालाय
BJP : २६ जुलैच्या पुरात बाळासाहेबांना एकटे सोडून स्वतः फाईव्हस्टार हाॅटेलमध्ये रहायला गेलते त्याचे काय? भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now