केंद्रातील मोदी सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द केले. मोदी सरकारच्या या निर्णयाचा कित्येक संघटना, नेते आणि समूहांनी कडाडून विरोध दर्शवला. राजकीय वर्तुळात देखील याच मुद्यावरून गदारोळ पाहायला मिळाला.
अनेकांनी त्यावेळी या कलमाबाबतच्या निर्णयाचा विरोध केला. आंदोलने करून प्रश्नाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला. मात्र केंद्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आणि अखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले.
गुरुवारी याचाच धागा पकडत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. याबाबत दिल्लीत अमित शाह ‘आइडिया ऑफ इंडिया फ्रॉम स्वराज टू न्यू इंडिया’ या परिसंवादात बोलत होते. यावेळी बोलताना शहा यांनी विरोधकांना लक्ष केलं.
यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी म्हंटलं आहे की, ‘३७० कलम रद्द झाल्यास रक्ताच्या नद्या वाहतील अशा शब्दांत लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणारे साधा एक छोटासा दगडही मारू शकले नाहीत,’ असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांना लक्ष केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘विद्यापीठांनी भिन्न विचारधारांसाठी कुस्तीची मैदाने बनू नयेत. तरुणांनी केवळ त्यांच्या हक्कांसाठी लढण्यापेक्षा कर्तव्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. ‘विद्यापीठे ही मतांच्या आदानप्रदानासाठीचे व्यासपीठ असावीत, विचारधारेच्या संघर्षांची ठिकाणे बनू नयेत, असंही त्यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, विचारसरणी कल्पना व चर्चा यांच्या माध्यमातून प्रगती करते, असेही शहा यांनी नमूद केले. ‘हक्कांसाठी लढण्यापेक्षा कर्तव्यांवर लक्ष केंद्रीत करा,’ असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना देतानाच गृहमंत्री अमित शहा यांनी भारताच्या संरक्षण धोरणावरही भाष्य केले.
महत्त्वाच्या बातम्या
आता अण्णा हजारेंच्या विरोधातच होणार आंदोलन; ढोल बजाव, अण्णा हजारे जगाओ आंदोलनाची घोषणा
काश्मिरी दहशतवादी यासिन मलिकला फाशी होणार कळताच पाकिस्तान संतापला, म्हणाला…
प्राजक्ताच्या बोल्ड भूमिकेवर तिच्या आईने थेट दिले होते ‘हे’ उत्तर; म्हणाली होती की, आलिया भटने…
केतकी प्रकरणावर शरद पोंक्षेंची प्रतिक्रीया, ‘केतकीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण..