Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली. आरजेडी, काँग्रेससोबत जात नवे सरकार स्थापन केले. यामुळे भाजप हादरले होते. ७० आमदार असूनही भाजपचा मुख्यमंत्री नसल्याची खदखद भाजप नेत्यांच्या मनात होतीच. त्यावर नितीश कुमार यांनी जे केले, त्या गोष्टीचा बदला आता भाजपने घेतला असल्याचे दिसते.
नितीश कुमार यांनी ‘भाजप प्रादेशिक पक्षांना संपवत आहे,’ अशी खरमरीत टीका भाजपवर केली. जेडीयूच्या आमदारांना भाजपसोबत आता सरकारमध्ये राहायचे नव्हते म्हणून मी हा निर्णय घेतला, असे नितीश कुमार यांनी त्यावेळी माध्यमांना सांगितले होते.भाजप पक्ष त्यावेळी शांत दिसला तरीही नितीश कुमार यांनी जो धक्का दिला. त्याचा बदला भाजप पक्ष कधी ना कधी घेणार, असा अनेकांचा अंदाज होताच. आता त्याप्रमाणे घडल्याचे दिसते.
अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेडीयूने १५ उमेदवार दिले होते. त्या १५ उमेदवारांपैकी ७ उमेदवार निवडून आले. २०२० डिसेंबरला त्यातल्या ६ लोकांनी भाजप प्रवेश केला. आता उरलेला शेवटचा आमदार सुद्धा भाजपच्या गळ्याला लागला. टेची कासो या आमदाराने भाजप प्रवेश केला आहे.
अशाप्रकारे विधानसभेत तब्बल ७ जागा जेडीयूच्या गटाला मिळाल्या. मात्र त्याचा शून्य फायदा त्यांना झाल्याचे चित्र स्पष्ट होते. अरुणाचल विधानसभेचे सदस्य संख्याबळ ६० आहे. त्यापैकी ४९ जागेवर भाजपचे आमदार आहेत. बहुमत असून सुद्धा त्यांनी जेडीयू गटाच्या आमदारांना फोडले.
बिहारमध्ये जेडीयूच्या आमदारांना घेऊन नितीश कुमार सत्तेतून बाहेर पडले. त्यामुळे भाजप-जेडीयू युतीचे सरकार कोसळले. याच गोष्टीचा बदला १६ दिवसात बिहारमध्ये नव्हे तर अरुणाचल प्रदेशमध्ये तरी भाजपने घेतला, असे बोलले जाते.
नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्त केला. त्यानंतर लगेच आरजेडी आणि काँग्रेससोबत हात मिळवणी करत नवे सरकार स्थापन केले. नव्या सरकारमध्ये नितेश कुमारच मुख्यमंत्री आहेत. यामुळे बिहारचे राजकारण ढवळून निघाले. जेडीयूने भाजपला मोठा दणका दिला. याच गोष्टीनंतर भाजप आता कोणकोणते धक्के नीतीश कुमार आणि त्यांच्या पक्षाला देते? हे येत्या काळात पहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांच्या नातीचा युरोपात डंका; अशी कामगिरी केली की संपुर्ण देशाला अभिमान वाटेल
सत्ताधाऱ्यांसह विरोधकही हास्यकल्लोळात बुडाले; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ठाकरेंच्या फोनचा ‘तो’ किस्सा
सोनिया- राहुल यांचं ‘मिशन काश्मीर’ फेल! गुलाम नबी आझाद यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी