Share

भाजपचा नवा फॉर्म्युला, ७० वर्षांवरील उमेदवारांना तिकीट नाही; ‘या’ बड्या नेत्यांचा पत्ता कटणार

२०२४ मध्ये तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री उशिरा पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी निवडक कॅबिनेट मंत्री, पक्षाचे प्रभारी आणि खासदारांची बैठक झाली, ज्यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. (bjp election 2024 70 year age formula)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. आता प्रत्येक खासदाराकडे १०० बूथ असतील आणि आमदारांकडे २५ बूथ असतील जिथे पक्ष कमकुवत आहे. यासोबतच तिकीट वाटपाबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

१९५५ नंतर जन्मलेल्या अशा विद्यमान खासदारांनाच २०२४ मध्ये लोकसभेचे तिकीट दिले जाणार आहे, यावर पक्षाच्या सर्वोच्च पातळीवर एकमत झाले आहे. या आधी जन्मलेल्या नेत्यांना तिकीट मिळणार नाही. म्हणजेच ७० पेक्षा जास्त वय ज्यांचे आहे, त्यांना तिकीट दिले जाणार नाही.

अशात या निर्णयामुळे राज्यातही सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. पण या नियमातून फक्त एक किंवा दोन अपवादांना सूट दिली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. तसेच हा नियम लागू झाल्यास भाजपच्या ३०१ पैकी ८१ खासदारांना तिकीट मिळणार नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीपासून ७० वर्षांवरील नेत्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न करण्याचा नियम भाजप पाळत आहे. जुन्या कार्यकर्त्यांनी नव्यांना वाट दिली तरच नव्या लोकांना संधी मिळेल, असा विश्वास पक्षाला आहे. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, या निर्णयाचा अर्थ जेष्ठांचे तिकीट कापणे असा होत नाही, तर नव्या नेत्यांना संधी देणे, असा होतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या मुखपत्राने ट्विट करुन ७० पार झालेल्या नेत्यांना तिकीट मिळणार नाही, असे ट्विट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि गिरीष बापट यांचेही तिकीट कापले जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच ७० पार केलेल्या नेत्यांना तिकीट नाही म्हटले तर ७० पार झालेल्या अनेक नेत्यांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे. कारण असे झाले तर मोदी स्वत: मोदीच निवडणूकीतून बाद होतील. त्यामुळे भाजपचे २०२४ मध्ये नक्की काय होणार? असा प्रश्न पडला आहे.

तसेच यापूर्वी संघाने ७५ वर्षांपुढील नेत्यांना सक्रिय राजकारणातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशीपासून माजी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक दिग्गज नेते २०१९ घरी बसले होते. आता जर ही वयोमर्यादा ७० केली तर यामुळे अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
फोन वाचला अन् रजत पाटीदारने स्वत:च्या लग्नाची तयारी सोडून थेट गाठली IPL, वाचा भन्नाट किस्सा
महाराजांचं नाव वापरण्याची शिवसेनेची लायकी नाही, हिंमत असेल तर.., संभाजीराजेंवरून मनसे आक्रमक
रात्री १ वाजता हॉस्टेलच्या मुलांनी विलासरावांना फोन केला अन् ४७ लाख मंजूर झाले, वाचा किस्सा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now