भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलं. ज्यामध्ये आत्तापर्यंत तपास यंत्रणांनी कारवाई केलेल्या लोकांची नावे आहेत. त्यानंतर आता पुढे कोणावर तपास यंत्रणांची धाड पडणार? याबाबत चर्चा सुरू असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत एक सूचक वक्तव्य केले आहे. (BJP doesn’t need Shinde group?, work on Plan B begins)
शिंदे गटाने भाजपसोबत नवे सरकार स्थापन केले. मात्र असमाधानी असल्याने केव्हाही शिंदे गट सरकारमधून बाहेर पडू शकतो. या भीतीनेच भाजपकडून प्लॅन बी आखला जात असल्याचे दमानिया यांनी म्हंटले आहे.
अनिल देशमुख, नवाब मलिक या नेत्यांवर तपास यंत्रणेने कारवाई केली. मात्र आता पुन्हा राष्ट्रवादीच्याच दुसऱ्या बड्या नेत्यावर लवकर तपास यंत्रणा कारवाई करणार असल्याचे सूचक वक्तव्य करत हे भाजपचे दबाव तंत्र आहे, असं त्या म्हणाल्या.
भाजपला सरकार स्थापनेसाठी दुसरा पर्याय हवा आहे. त्यासाठीच हे सर्व सुरू आहे. भाजपला फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करायचे होते. त्यानंतर पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चीट देण्यात आली. मात्र सरकार स्थापन झाले नाही.
आता राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे तपास यंत्रणेचा ससेमिरा लावून आपला हेतू साध्य करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पुढे दमानिया यांनी भाजपच्या दबावापुढे तपास यंत्रणा विरोधकांवर कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप केला. पुढे काय होणार? हे मोहित कंबोज यांना कसं कळतं, असा प्रति प्रश्नही त्यांनी विचारला.
किरीट सोमय्या यांना रिटायर्ड केल्यावर त्यांचे काम आता मोहित कंबोज यांना भाजपने दिले असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हंटले. भाजप हवी तेव्हा कुणाचीही फाईल ओपन करते, हवी तेव्हा बंद करते. विरोधकांना गप्प करण्याचा आणि अजित पवार यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : अधिवेशन काळात ‘या’ मुद्द्यावरून एकनाथ शिंदे गट येणार अडचणीत; सरकारचीही सत्वपरीक्षा
‘त्या सीसीटीव्हीत बरेच काही सापडेल’; मेटे यांच्या ड्रायव्हरने केला मोठा खुलासा
PHOTO: बिपाशा बसू वयाच्या ४३ व्या वर्षी झाली प्रेग्नेंट, शर्ट पॅन्ट घालून बेबी बम्पचा फोटो केला शेअर