मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणावर देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले, “ठोक के जवाब मिलेगा”!

अखेर काल राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसीमध्ये जाहीर सभा पार पडली. अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे लागलं होतं. या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या बदल्या भूमिकेवर, विरोधकांवर याचबरोबर हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस ‘मुंबई स्वतंत्र करू’ म्हणाले. मुंबई स्वतंत्र करू म्हणायला ती काय पारतंत्र्यात आहे का, असा सवाल यावेळी सभेत बोलताना ठाकरेंनी उपस्थित केला. मूळात भाजप आणि स्वातंत्र्यांचा संबंध काय? स्वातंत्र्यावेळी भाजप नव्हता. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात होता. पण त्यांचा स्वातंत्र्य लढाईत सहभागी नव्हता, असंही ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘केंद्र सरकार आता दाऊदच्या मागे लागले आहेत, पण दाऊद जर का बोलला मी भाजपात येतो, तर मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. आमच्यात ये मग तुला मंत्री बनवतो. आणि मग बोलतील दाऊद म्हणजे आमचा गुणाचा पुतळा आहे असा सणसणीत टोला ठाकरे यांनी लगावला.

आता यावर आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या टिका भाजपच्या जिव्हारी लागल्या आहेत. यावरूनच आता माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आक्रमक झाले आहे. ट्विट करत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेवर जोरदार पलटवार केला आहे.

याबाबत ट्विट करत फडणवीस म्हणतात, “सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत. सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम… अरे छट. हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करताना भाजप – सेना युती बद्दल देखील परखड मत मांडलं. ‘शिवसेना २५ वर्षे युतीत सडली हे मी म्हटलं होतं. आता त्यांचा भेसूर आणि बेसूर चेहरा रोज पाहतोय. आम्ही अशा लोकांसोबत २५ वर्षे काढली यावर विश्वास बसत नसल्याच त्यांनी म्हंटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
बाॅलीवूडबाबतच्या वक्तव्यावर कंगनाचा सपशेल यु टर्न; आता महेशबाबूला पाठींबा देत म्हणाली…
पठ्याने मातीपासून बनवला चक्क कुलर, ना वीजबिल ना पर्यावरणाची हानी, वाचा कसा केला हा आविष्कार
तेव्हा आनंद दिघेच राज ठाकरेंना म्हणाले होते, आता हिंदुत्वाची जबाबदारी तुमची; व्हिडिओ व्हायरल
सलमान खानचे लकी ब्रेसलेट पूजा हेगडेच्या हातात, ‘या’ चित्रपटाच्या सेटवरून व्हायरल झाले फोटो