Share

“गांधी घराण्याच्या दावणीला बांधून स्वत:ला गुलाम घोषीत करणाऱ्या राष्ट्रवादीने घराणेशाहीवर बोलू नये”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटलांनी नुकतेच एक ट्विट केले होते ज्यामध्ये त्यांनी भाजपच्या घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांनी भाजप नेते राजनाथ सिंह यांच्या वंशावळीचा फोटो शेअर करत भाजपमधील घराणेशाहीचा पुरावा दाखवला होता. त्यावर आता राजकारण तापले आहे आणि भाजपनेही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची राजकारणातील वंशावळ ट्विट करत रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे की, लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण. घराणेशाहीला विरोध करता करता भाजपात कधी घराणेशाही घुसली भाजपाला समजलच नाही? घराणेशाही च्या विरोधात लढणारी पार्टी म्हणे.

पार्टी विथ डिफरेन्स असं ट्विट करत त्यांनी एक फोटो शेअर केला होता. रुपाली पाटील ठोंबरे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नात्यातील तिघांचे फोटो आणि त्यांच्या राजकारणातील पदाची माहिती दिली होती. या तीनही उमेदवारांना भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले आहे.

त्यात राजनाथ सिंह यांचा मुलगा, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नातू, खासदार हुकूम सिंग यांची मुलगी यांचे फोटो आहेत. तरीही भाजपमध्ये घराणेशाही नाही बरं का? असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. त्यांचे हे ट्विट सध्या खुप व्हायरल होत आहे. त्यांच्या याच ट्विटवर भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपाने ट्विट केले आहे की, गांधी घराण्याच्या दावणीला स्वतःला बांधून घेऊन, स्वतःला गुलाम घोषित करून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने घराणेशाहीवर बोलू नये! तुम्ही, फक्त काँग्रेसचे 23 वर्षांपासून गांधी घराण्याकडे असलेलं अध्यक्षपद बदलण्याची हिंमत दाखवा, मग नंतर घराणेशाहीवर बोला, असा टोला रुपाली पाटलांना लगावला आहे.

दरम्यान, घराणेशाहीवरून अनेकवेळा दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला आहे. अनेकवेळा नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. काही दिवसांपुर्वी मोदींनीही घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका केली होती. संविधान दिनाच्या दिवशी मोदी म्हणाले होते की, राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. एका पक्षाची सूत्रं पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याच्या हातात राहणं लोकशाहीच्या विरोधात आहे.

ज्यांनी लोकशाही मूल्य गमावलं आहे ते लोकशाहीचं संरक्षण कसं करु शकतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, भारत एका अशा संकटाकडे जात आहे जो संविधानाशी समर्पित असलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. आपल्या चांगल्या गुणांच्या आधारे एका परिवारातून अनेक लोकं राजकारणात येत असतील तर ती घराणेशाही नसते, असं मोदी म्हणाले होते.

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1482997750325452803?s=20

महत्वाच्या बातम्या
स्टॉक नाही ही तर कुबेराची खाण! २५ रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने १ लाखाचे केले ३० लाख
VIDEO: मद्यधुंद चालकाने रिव्हर्स गिअरमध्ये पळवली कार, स्टॉलसकट लोकांनाही दिली धडक
अधिकाऱ्याच्या घरावर छापा; 7 BMW, मर्सिडीज,14 कोटी कॅश, सोन्या चांदीचे दागिने जप्त
चीनच्या गुप्तहेराला मोदी सरकारने दिला पद्मश्री; देशाला हादरवून टाकणारी माहिती आली समोर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now