Share

“दगडूशेठला जायचंय हे माहिती असूनही नॉनव्हेज खाल्लंच कसं? शरद पवारांची देवी-देवतांवर श्रध्दाच नाही”

गेल्या काही दिवसांपासून मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच ते नास्तिक असल्याचेही राज ठाकरेंनी म्हटले होते. (bjp criticize sharad pawar because of dagdusheth temple)

भाजपही नास्तिकच्या मुद्यावरुन शरद पवारांवर निशाणा साधताना दिसून येत आहे. अशात सध्या हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शरद पवार हे शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यावेळी ते दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतील अशी चर्चा होती, पण त्यांनी दर्शन घेतले नाही.

आज मी मांसाहार केला आहे, त्यामुळे मी मंदिरात जाणार नाही, असे शरद पवारांनी म्हटले होते. आता याच मुद्यावरुन भाजपने शरद पवारांवर टीका केली आहे. आता भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी यावरुन शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

आज आपल्याला दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात जायचे आहे, हे माहिती असूनही शरद पवारांनी नॉनव्हेज खाल्ल कसं? शरद पवारांची हिंदू देवी-देवतांवर श्रद्धाच नाही. त्यामुळे ते मंदिरात जातीलच कसे? मौलाना शरद पवार यांचा काल जुम्मा होता. त्यामुळेच त्यांनी नॉनव्हेज खाल्ल्याचे कारण देत मंदिरात जाण्यास नकार दिला, असे तुषार भोसले यांनी म्हटले आहे.

एरवी शरद पवार हे इफ्तार पार्ट्या झोडत फिरत असतात. पण दगडूशेठच्या मंदिरात जाण्याची पवारांना एलर्जी आहे. त्यांनी कितीही कारणे दिली तरी शरद पवार हे नास्तिक आहे. ही संपुर्ण गोष्ट महाराष्ट्राला माहिती आहे, असेही तुषार भोसले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दगडूशेठच्या शेजारी असणारी गृहविभागाची जागा दगडूशेठ ट्रस्टला देण्याची अनेक दिवसांची मागणी होती. त्यामुळे शरद पवार पुण्यात आले होते. ते भिडे वाडा आणि दगडूशेठ मंदिराच्या पाहणीसाठी पोहोचले. ते मंदिराच्या आत दर्शनासाठी जाणार होते, पण त्यांनी बाहेरुन दर्शन घेतले. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-
कालिन भैया की बाबा निराला, कोण आहे ओटीटीचा बादशाह? कोण घेतं सगळ्यात जास्त मानधन?
प्राजक्ता गायकवाडला सेटवरच भेटली चिमुकली फॅन, दिले घरी येण्याचे आमंत्रण, प्राजक्ता म्हणाली…
काकीकडून उधार पैसै घेऊन मुंबईत आला होता ‘हा’ अभिनेता, नंतर बनला बॉलिवूडचा ‘पितामह’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now