Share

bjp : राजकारण फिरलं..! भाजपाला भलं मोठं खिंडार; भाजपमधील मोठा गट करणार ठाकरे गटात करणार प्रवेश

Uddhav-Thakre-Devendra-Fadanvis.

bjp : राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडतं आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यापासून अनेकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेला मोठी गळती लागली आहे.

ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, एवढंच नाहीतर बड्या – बड्या नेत्यांनी देखील शिंदे गटाची वाट धरल्याने शिवसेनेच्या गोटात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालं आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे पक्षबांधणीसाठी जोमाने कामाला लागले आहेत.

अशातच ठाकरे गटासाठी एक सकारात्मक बातमी समोर येतं आहे. भाजपमधील अनेक कार्यकर्ते ठाकरे गटात जाणार असल्याच वृत्त समोर आलं आहे. यामुळे आता भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजपमधील नेत्यांना जबर धक्का बसला असल्याचं बोललं जातं आहे.

मिळालेल्या महितीनुसार, बुलडाण्यातील भाजप कार्यकर्ते आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हे कार्यकर्ते शिवसेनेचा भगवा हाती घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे,  शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना धक्का बसला आहे.

ठाकरे गटात जाणारे सर्व कार्यकर्ते जाधव यांच्या मतदारसंघातील असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आज मातोश्रीवर बुलडाण्यातील शिवसैनिकांची बैठक होणार असल्याचं बोललं जातं आहे. यामुळे सध्या ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती खुद्द उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आलेल्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून यावर अद्याप भाजपच्या नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

महत्वाच्या बातम्या-
devendra fadanvis : फडणवीसांच्या खेळीमुळे आशिष शेलारांचा झाला गेम, भाजपने माघार घेतल्यामुळे पडले तोंडघशी
Sanjay Raut : माघार घेतली नसती तरी आम्ही जिंकलोच असतो, राऊतांनी थेट तुरूंगातून सांगीतला मताधिक्याचा आकडा
Shakti Kapoor : अभिनेत्रीचे शक्ती कपूरवर गंभीर आरोप, म्हणाली, बोल्ड सीन करताना तो एवढा उत्तेजीत झालता कि….

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now