Share

भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे शिवसेना, भाजपचे ५ हजार कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर

कित्येक वर्षांपासून असलेली शिवसेना-भाजपची युती २०१९ ला तुटली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना नेते आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. तसेच अनेक कार्यकर्ते आणि नेते भाजपला सोडून महाविकास आघाडीतील पक्षात येत आहे. (bjp 5 thousand workers leave bjp and join shivsena)

नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत अनेक ठिकाणी शिवसेनेने भाजपला नमवले आहे. तसेच सोयगांव नगरपंचायतीवर शिवसेनेने भाजपला हरवून सत्ता मिळवली आहे. त्यानंतर भाजपचे अनेक सदस्य शिवसेनेने फोडून त्यांना धक्का दिला. आता पुन्हा शिवसेना भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे, असे संकेत राज्याचे महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.

शिवसेनेकडून शिवतेज अभियानाअंतर्गत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अब्दुल सत्तार बोलत होते. नगरपंचायत निवडणूकीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व दिसले आहे. मतदार संघातून भाजपचा लवकरच सुपडा साफ होणार आहे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

तसेच भाजपचे पाच हजार पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर आहे, असेही अब्दुल सत्ता यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गळाला लावून अब्दुल सत्तार हे रावसाहेब दानवे यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

भाजपचे अनेक पदाधिकारी आपल्या संपर्कात आहे. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील ५ हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिवसेनेत येणार आहे. आपल्या मतदारसंघातील कमळाबाईचा बंदोबस्त करणार असेही अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमात म्हटले आहे.

दरम्यान, सोयगाव नगरपंचायत निवडणूकीमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी भाजपचे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का दिला आहे.पण शुक्रवारी त्यांनी दानवेंना आणखी एक धक्का दिला आहे. सत्तार यांनी भाजपचे ४ नवनिर्वाचित सदस्य सेनेत खेचून आणले आहे.

महत्वाच्या बातम्या-
रश्मिका झाली oops moment ची शिकार, पाय वर करताच दिसले असे काही की.., पहा फोटो
मृतांचा आकडा लपवणाऱ्या चीनचा बुरखा फाटला, गलवान झटापटीत चीनचे ३८ सैनिक झाले होते ठार
२७ वर्षीय पोलीस शिपायाचा व्यायाम करताना मृत्यु, चालता चालता छातीत कळ आली अन्…

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now