Share

भाजपच्या ‘त्या’ २ डझन नेत्यांना मिळणार VIP सुरक्षा; मोदी सरकारने केली मोठी घोषणा

Narendra modi

केंद्र सरकारने उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान २५ नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून सुरक्षा मिळालेल्या नेत्यांमध्ये भाजपशिवाय समाजवादी पक्ष आणि अकाली दलाच्या नेत्यांचाही समावेश आहे. यासाठी सीआरपीएफसह सीआयएसएफला सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतलेल्या मोठ्या नावांमध्ये भाजप नेते एसपीएस बघेल यांच्या नावाचा समावेश आहे, ज्यांच्यावर नुकताच करहालमध्ये हल्ला झाला होता. बघेल हे सपा नेते अखिलेश यादव यांच्या विरोधात करहालमध्ये निवडणूक लढवत आहेत. अशा स्थितीत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक नेत्यांना केंद्रीय सुरक्षा दलांची सुरक्षा स्वतंत्रपणे पुरवण्यात आल्याचे सांगण्यात आले. म्हणजेच, अशा काही नेत्यांना सुरक्षा देण्यात आली आहे, ज्यांना राज्य सरकारने आधीच पोलिस संरक्षण दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुका संपल्यानंतर अनेक उमेदवारांकडून ही व्हीआयपी सुरक्षा काढून घेतली जाणार आहे.

या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्याकडे सोपवण्यात आली असून, नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. दोन्ही निमलष्करी दल त्यांच्या विशेष कमांडो पथकाद्वारे व्हीआयपी सुरक्षा पुरवतात.

एसपीएस बघेल यांच्याशिवाय दिल्लीतील खासदार आणि गायक हंसराज हंस यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा दिली आहे. याशिवाय यूपीच्या भदोही लोकसभा मतदारसंघाचे खासदार रमेश चंद बिंद यांना एक्स श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या छोट्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफच्या हाती असेल. याशिवाय सीआरपीएफला यूपी आणि पंजाबमधील किमान २० नेत्यांना सुरक्षा देण्यास सांगण्यात आले आहे.

पंजाबमधील शिरोमणी अकाली दल नेते सुखविंदर सिंग बिंद्रा आणि पक्षाचे उमेदवार परमिंदर सिंग धिंडसा आणि अवतार सिंग झीरा यांना सुरक्षा देण्यात येणार आहे. त्यांना Y ते Y+ स्तरावरील सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या सर्वांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा पुढील निर्णय १० मार्च रोजी घेतला जाईल, असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-
जिंकण्यासाठी कायपण! माजी आमदार म्हणाला, दारु वाटा, पैसे वाटा नाहीतर दंगली करा, पण निवडणुक जिंका
चला बसुया! पुरुषांपेक्षा महिलाच जास्त म्हणताय, दारु पिण्याऱ्यांची ‘ही’ आकडेवारी बघून बसेल धक्का
खळबळजनक! पुण्यात प्रसिद्ध बिल्डरने तरूणीवर केला बलात्कार, डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now