Share

सलमान खानला मारण्यासाठी घेतली ४ लाखांची रायफल, पण ‘असा’ फसला प्लॅन, लॉरेन्स बिश्नोईचा मोठा खुलासा

सलमान खानला मारण्यासाठी घेतली ४ लाखांची रायफल, पण ‘असा’ फसला प्लॅन, लॉरेन्स बिश्नोईचा मोठा खुलासा

सलमानचा खुन करण्यासाठी आणली होती ४ लाखांची रायफल, ‘असा’ आखला होता प्लॅन, वाचून हादराल

सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यानंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. सलमान खानला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

त्याने सलमानच्या हत्येचा कटही रचला होता. पण शेवटी त्यांचा कट फसला. 2021 मध्ये सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीत तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली होती. लॉरेन्सने खुलासा केला होता की, त्याने राजस्थानचा गँगस्टर संपत नेहराला सलमान खानला मारण्यास सांगितले होते.

यानंतर संपत नेहरा मुंबईला गेला. संपतने सलमान खानच्या घराची रेकीही केली होती. लॉरेन्स बिश्नोईने चौकशीदरम्यान संपतकडे पिस्तूल असल्याचे उघड केले होते. लांब अंतरामुळे संपतला सलमान खानपर्यंत पोहोचता आले नाही. यानंतर संपतला त्याच्या गावातील दिनेश फौजीमार्फत आरके स्प्रिंग रायफल मिळाली.

बिष्णोईने ही रायफल त्याच्या ओळखीच्या अनिल पंड्याकडून 3-4 लाखांना विकत घेतली होती. पण जेव्हा रायफल दिनेशकडे होती तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली. संपत नेहरालाही अटक करण्यात आली होती. वास्तविक, काळवीट शिकार प्रकरणामुळे लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

यामागे कारण असे होते की, गँगस्टर लॉरेन्स हा बिश्नोई समाजातील आहे. त्यामुळे काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला आरोपी बनवल्यावर लॉरेन्स चांगलाच संतापला होता. लॉरेन्स बिश्नोई गटाने सलमान खानला मारण्याची योजनाही आखली होती. रेडी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लॉरेन्सने सलमान खानवर हल्ल्याची योजना आखली होती. मात्र त्यात यश मिळू शकले नाही.

लॉरेन्स बिश्नोई हा दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे आणि तेथून तो काम करतो. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा ग्रुप सुपारी घेऊन लोकांच्या हत्या करतो. त्यानंतर फेसबुकवर आपला गुन्हा कबूल करतो. या टोळीचे जाळे देशभर पसरले आहे. त्याच्या पोरांची संख्या 700 पेक्षा जास्त आहे.

लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार एकत्र काम करतात. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा हात असल्याचे वृत्त आहे. हे पत्र सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने पाठवले होते. वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनेड येथे रविवारी हे पत्र सापडले.

सलीम मॉर्निंग वॉकनंतर ज्या ठिकाणी बसायला जातात तिथे सलीम खान यांच्या गार्डला ही चिट्ठी सापडली होती. सलीम खान, सलमान खान, लवकरच तुमची अवस्था सिद्धू मूसवालासारखी होईल,  असे धमकीवजा पत्र लिहिले होते. याप्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी भादंवि कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

महत्वाच्या बातम्या
बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘काकांनी माझ्या मांडीला…’
सिद्धू मुसेवाला प्रकरणात समोर आलं ‘पुणे कनेक्शन’, ८ शुटर्सची ओळख पटली, वाचून धक्का बसेल
खासदार असूनही IPL मध्ये काम का करतोय? संतापलेला गंभीर म्हणाला, ५००० लोकांना खायला…
एकेकाळी घरोघरी जाऊन देवीची गाणी म्हणायची नेहा कक्कर, आज आहे कोट्यावधींची मालकीण

क्राईम ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now