Share

बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये करण जोहरचे नाव, सुशांत सिंग राजपूत कनेक्शन आले समोर; चौकशीत धक्कादायक खुलासा

अलीकडेच सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते, ज्यामध्ये सलमानला सिद्धू मुसेवाला करुन टाकू असे म्हटले होते. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी याबाबत चौकशी सुरु केली आहे. (bishnoi gang and sushant singh rajput connection)

या प्रकरणाच्या तपासादरम्यान रोज धक्कादायक खुलासे होत आहे. असे असतानाच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिद्धू मुसेवाला आणि मकोका प्रकरणात अडकलेला आरोपी सौरव कांबळे उर्फ महाकाल याच्या चौकशीदरम्यान त्याने करण जोहरबद्दल एक खुलासा केला आहे.

बिश्नोई टोळीच्या टार्गेटवर फक्त सलमान खानच नाहीये, तर इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरही होता, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांच्या चौकशीदरम्यान महाकालने हा खुलासा केला आहे. या खुलाशामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सलमान खान धमकी प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान सौरव उर्फ महाकालने पोलिसांना जबाब दिला आहे. त्याने दिलेल्या जबाबानुसार, सलमान खान व्यतिरिक्त चित्रपट निर्माता करण जोहरचे नाव देखील बिश्नोई टोळीच्या बॉलिवूड हिटलिस्टमध्ये आहे.

सौरवने पुणे पोलिसांना दिलेल्या जबानीनुसार, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला करण जोहर प्रामुख्याने जबाबदार होता आणि त्यामुळेच त्याचाही बिश्नोई गँगच्या हिटलिस्टमध्ये समावेश झाला होता. याच कारणावरून चित्रपट निर्माते करण जोहरला धमकावून बिष्णोई टोळीने ५ कोटींची खंडणी वसूल करण्याची तयारी केली होती.

चौकशीदरम्यान सौरवने असेही सांगितले आहे की, सिग्नल ऍपद्वारे तो विक्रमशी जोडला गेला होता आणि तो फक्त विक्रम ब्रारसाठी काम करत असे, त्यामुळे त्याला बिश्नोई टोळीच्या अनेक हालचाली आणि हिटलिस्टची माहिती होती. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी सौरव महाकालला सिद्धू मुसेवाला हत्याकांड आणि सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणी अटक केली होती.

महत्वाच्या बातम्या-
विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे नाराज? ट्विटर प्रोफाईल बदलल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण
“रडतोय काय लका, आपल्याला पुढं जाऊन जिंकायचं”, 35 % मिळालेल्या मुलाला बापाने दिला आधार
आईला १००व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मोदींनी जे केले ते पाहून डोळे अश्रूंनी भरून जातील

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन राज्य

Join WhatsApp

Join Now