Share

सलमानचा एकदा कार्यक्रम करु द्या, मग मी कधीच काही करणार नाही; बिश्नोईच्या भावाच्या वक्तव्याने उडाली खळबळ

अलीकडेच सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते, ज्यामध्ये सलमानला सिद्धू मुसेवाला करुन टाकू असे म्हटले होते. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. (bishnoi brother on salman khan)

अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने सलमान खान हे आपले पुढचे लक्ष्य असल्याचे सांगितले आहे. काळवीट मारल्याबद्दल सलमान खानने माफी मागितली तर तो वाचेल नाही, तर आम्ही त्याचा कार्यक्रम करुन टाकू, असे लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने म्हटले आहे.

एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ राजवीर सोपूला सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर त्याच्या पुढील लक्ष्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने थेट सलमान खानचे नाव घेतले. राजवीर सोपू म्हणाला, सलमान खानने काळवीट मारले असून आज तो सर्व खटल्यातून निर्दोष सुटला आहे. काळवीटाला मारून त्याने मोठी चूक केली आहे. भविष्यात आम्ही सलमानचा कार्यक्रम नक्की करु त्यात कोणताच बदल करणार नाही.

यानंतर जेव्हा राजवीर सोपूची मुलाखत घेणाऱ्याने तू माझ्यासारखा तरुण आहेस, स्वतः जग आणि लोकांनाही जगू दे, असे सांगितले. त्यावर राजवीर सोपूने एक हैराण करणारे वक्तव्य केले. तो म्हणाला की, मी वचन देतो सलमानचा एकदा कार्यक्रम केल्यानंतर मी कधीच काही करणार नाही.

तसेच राजवीर सोपूने सांगितले की, सलमानने आपली चूक कधीच मान्य केली नाहीये, त्याने फक्त एक मुलाखत दिली. त्याने चूक मान्य केली असती तर माफ केले असते. सलमानने चुक मान्य करुन माफी मागितली तर आम्ही त्याला माफ करु, असे राजवीरने म्हटले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. तसेच चार वर्षांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईनेही सलमान खानला मारण्याची घोषणा केली होती. सलमान जेव्हाही जोधपूरला येईल तेव्हा त्याला मारून टाकू, असे तो म्हणाला होता. लॉरेन्स सध्या तुरुंगात आहे, परंतु त्याचे गुंड सर्वत्र आहेत. अशा परिस्थितीत सलमान खानचा धोका वाढला असून मुंबई पोलीस त्याच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
जर भारताने माफी मागितली नाही तर…’, पैगंबर अपमान प्रकरणी क्रिकेटर मोईन अलीची भारताला धमकी?
जेजुरीच्या खंडेरायाला भंडारा इतका प्रिय का आहे? यामागे आहे शंकराची पौराणिक कथा
मंत्र्यांसमोरच तुफान राडा; भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन राज्य

Join WhatsApp

Join Now