Bindass kavya | औरंगाबाद येथे राहणारी बिंदास काव्या ही फेमस युट्यूबर काही दिवसांपुर्वी गायब झाली होती. ती अचानक बेपत्ता झाल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. ती बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी व्हिडीओ पोस्ट केला होता आणि पोलिसांकडे तक्रारही केली होती.
यानंतर काव्याचा शोध घेतल्यानंतर ती मध्यप्रदेशमध्ये इटारसी येथे सापडली होती. पण या प्रकरणात आता खळबळजनक खुलासा झाला आहे. बिंदास काव्या गायब झाल्याची बातमी समोर येताच चर्चेचा विषय ठरली होती. काव्याचे सोशल मिडीयावर ५ मिलीयनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
९ सप्टेंबर रोजी ती बेपत्ता झाली होती. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली होती. ती आपला फोन घरीच विसरली आहे असं तिच्या घरच्यांनी सांगितलं होतं. तिच्या आईवडिलांनी तिच्याच फोनवर एक व्हिडीओ शुट करून चाहत्यांना भावनिक आवाहन केलं होतं.
यावेळी तिचे आई वडील ढसाढसा रडले होते. ती नंतर सापडली पण असं सांगण्यात आलं होतं की, घरच्यांवर नाराज होऊन ती घरातून निघून गेली होती. पण सत्य काही वेगळंच आहे असं समोर आलं आहे. इटारसी स्थानकावर ती सापडल्यानंतर आई-वडील तिथे हजर झाले होते.
यानंतर इटारसीच्या पोलिसांनी तिला तिथल्या बाल न्याय मंडळासमोर उभं करणं बंधनकारक होतं पण त्यांनी तसं केलं नाही. पण त्यांनी तसं न करता तिला सरळ औरंगाबाद नेलं आणि आई-वडिलांकडे सुपूर्त केलं. त्यानंतर आई वडिलांनी ती सुरक्षित असल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं होतं. पण या प्रकरणात आता वेगळाच खुलासा झाला आहे.
बिंदास काव्या गायब होण्याच्या मागे तिच्या घरच्यांचीच योजना होती अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. काव्या आणि तिच्या आई-वडिलांनी फॉलोवर्स वाढवण्यासाठी हा सगळा बनाव रचला होता असा खुलासा झाला आहे. सोशल मिडीयावर जितके जास्त फॉलोवर्स तितकी पैसै कमावण्याची संधी असते हे सगळ्यांनाच माहिती आहे.
बाल न्याय मंडळाच्या ऍड. आशा शेरखाने-कटके यांनी ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, दर्जाहीन प्रसिद्धीसाठी, पोलीस, रेल्वे, बाल न्याय मंडळ या यंत्रणांना वेठीस धरलं गेलं आहे. हा सगळा घटनाक्रम पुर्वनियोजित होता. नागरीकांना लाईक करण्यास भाग पाडलं गेलं. हे योग्य नाही असंही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
Shivsena : उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेले ‘थापा’ आहेत तरी कोण?
congress : अशोक गेहलोत अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर? राजस्थानमधील सत्तासंघर्षादरम्यान चर्चेला उधाण
Tanaji Sawant : तानाजी सावंतांसाठी चंद्रकांत पाटलांनी जोडले हात; वादग्रस्त विधानाबाबत म्हणाले…
MS Dhoni: पुढचा वर्ल्ड कप भारतच जिंकणार, लिहून घ्या; धोनीने केली मोठी भविष्यवाणी, पहा व्हिडीओ