भारतातील केरळ राज्यात सर्वात जास्त हुशार व्यक्तीची संख्या आहे असे अनेकदा सांगण्यात येते. परंतु आता केरळमधील एका दांपत्याने हे म्हणणे खरे ठरवून दाखवले आहे. या दाम्पत्याने सुपारीच्या पानापासून टेबलवेअर प्रोजेक्ट बनवत कोट्यावधी रुपये कमवून आपली हुशारकी सिध्द केली आहे. परदेशातील नोकरी सोडून भारतात सुरु केलेल्या या दांपत्याच्या व्यवसायाला आता चांगलेच यश आले आहे.
केरळमधील मदुकई गावातील देवकुमार नारायणन आणि पत्नी सारन्या यांनी दिल्ली विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर या दांपत्याने उज्वल भविष्याचा विचार करत संयुक्त अरब अमिरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या आधारावर त्यांनी 2014 साली परदेशात झेप घेतली.
यूएईमध्ये जाऊन देवकुमारने बड्या टेलिकॉम कंपनीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली तर सारन्याने सिविल इंजिनिअर पदावर एका वॉटरप्रूफिंग कंपनीमध्ये काम सुरू केले. या दांपत्याचे सर्व काही सुरळीत सुरु असताना सुध्दा त्याचे पुर्ण लक्ष गावाकडे लागून होते. त्या दोघांना मशिनसारखे काम करणे परवड नव्हते.
त्यामुळे त्यांनी भारतात कायमचे येण्याचा निर्णय घेतला. भारतात आल्यानंतर त्यांना नव्याने सर्व काही सुरु करावे लागणार होते. यात व्यवसाय ही नविन शोधायचा होता. याकाळातच या दोघांच्या लक्षात आले की, आपण सुपारीच्या पानापासून काही तरी वेगळे करु शकतो. यावर जास्त विचार केल्यानंतर त्यांनी सुपारीच्या पानांपासून टेबलवेअर प्रोडक्ट बनविण्याचा निर्णय घेतला.
यात यश येईल का माहित नसताना सुध्दा त्यांनी आपल्या या नविन व्यवसायाला सुरुवात केली. पुढे जाऊन यामध्ये त्यांना चांगलीच यशप्राप्ती झाली. सध्या त्यांच्या कंपनीची उलाढाल १८ कोटी रुपये असून भारतातील कित्येक तरुण आणि गरजू महिला कंपनीत काम करत आहेत. दांपत्याने सुरु केलेला सुपारीच्या पानांपासून टेबलवेअर प्रोडक्ट आज परदेशात देखील ओळखला जात आहे.
या प्रोजेक्ट अंतर्गत पिशव्यापासून साबण पॅकेजिंग बनवण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर, कंपनीत सुपारीच्या पानांपासून वाट्या, चमचे, ताट, साबणाचे कव्हर आणि ओळखपत्र असे १८ प्रकारची उत्पादने बनवली जात आहेत. या कंपनेचे नाव सुध्दा लोकांच्या लक्षात येईल असेच ठेवण्यात आले आहे.
स्थानिक पातळीवर सुपारीला पाला म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कंपनीचे नाव ‘पापला’ असे ठेवण्यात आले आहे. पापला कंपनी कोणत्याही झाडाला इजा पोहचवत नाही. झाडाची सुपारीची पाने गळून पडल्यानंतर त्यापासून वेगवेगळी उत्पादने बनविण्यात येतात.
महत्वाच्या बातम्या
…तर मी विधानसभेत फाशी घेईन; सभागृहात आमदार रवी राणा भडकले, सभागृह स्तब्ध
राज्यपालांना हटवण्यासाठी एक फोनच बस्स झाला; महाविकास आघाडीतील बड्या मंत्र्याची थेट धमकी
शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर, खोलीत आढळले रक्ताचे डाग
शूटिंग सुरू असताना सनी लिओनीचा अपघात, चेहऱ्याची झाली भयानक अवस्था; पहा हादरवून टाकणारा व्हिडीओ






