रस्त्यावरून चालताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, मग तुम्ही चालत असाल किंवा बाईक किंवा कारने असाल, नाहीतर तुम्हीही रस्त्यावरील अपघाताला बळी पडू शकता. जगात दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. यातील काही लोक विनाकारण आपला जीव गमावतात, म्हणजेच इतरांच्या चुकीमुळे ते आपला जीव गमावतात. (bike railway crossing video)
वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्याप्रमाणेच रेल्वे फाटकाशी संबंधित नियम पाळणेही गरजेचे आहे, कारण त्यात थोडासा निष्काळजीपणाही गंभीर अपघाताचे कारण बनू शकतो. रेल्वे फाटक बंद असल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण तरीही लोक जीव धोक्यात घालून या बाजूने जाण्याचा प्रयत्न करत असतात.
आता असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचा थोडक्यात जीव वाचला आहे. हा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे. हा व्हिडिओ १२ फेब्रुवारीचा असून मुंबईतील रेल्वे क्रॉसिंगवरचा आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये रेल्वे फाटक बंद असल्याचे दिसत आहे. दोन्ही बाजूला अनेक लोक उभे आहेत आणि काही लोक गेटच्या आत चालत आहेत, तर एक व्यक्ती दुचाकी घेऊन गेट ओलांडून जात आहे. इतक्यात एक भरधाव गाडी रुळावर येते. अशा स्थितीत त्या व्यक्तीला काहीच समजत नाही.
सज्जन फाटक देख रुकें, मानें सुरक्षा उपाय,
बलिहारी बुद्धि मूर्ख की, यमलोक दियो दिखाय. pic.twitter.com/CiVz3RoRrl— Dipanshu Kabra (@ipskabra) February 15, 2022
जीव वाचवण्यासाठी तो बाईक तिथेच सोडून पळू लागतो. सुदैवाने तो वेळेत दुचाकीवरून सोडतो, नाहीतर अवघ्या २-३ सेकंदाचा उशीर झाला असता त्याचा जीव गेला असता. या अपघातात त्या व्यक्तीच्या दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. हा व्हिडीओ असा आहे की तो पाहिल्यानंतर तुम्हाच्या अंगावर नक्की काटा येईल.
हा धक्कादायक व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. अवघ्या २५ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत ४९ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर ३ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘यमराज आले होते, पण वेळ नव्हता’, तर दुसऱ्या यूजरने ‘यमराज ड्युटीवर नसतील अशी कमेंट केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘संज्याने जी भाषा पत्रकार परिषदेमध्ये वापरली ती महाराष्ट्राच्या कुठल्या संस्कृतीत बसते हे शिवसेनेने सांगावं’
“संजय राऊतांना गरज लागली तेव्ही मी आर्थिक मदत केली”; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
बाॅलीवूडवर कोसळला दुखा:चा डोंगर! डिस्को म्युझिक आणलेल्या ज्येष्ठ संगीतकाराचे निधन