बिहार सरकारने जमुई जिल्ह्यात देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठ्याचा सापडला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) नुसार, जमुई जिल्ह्यात सुमारे २२२.८८ दशलक्ष (२२ कोटी) टन सोन्याचा साठा आहे ज्यात ३७.६ कोटी टन खनिज-समृद्ध धातूचा समावेश आहे. (bihar gold reserve find out because of ant)
खाण आणि भूगर्भशास्त्र विभाग GSI आणि राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) यांच्यासह जमुईमध्ये सोन्याच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी तपासात गुंतलेल्या एजन्सींशी राज्य सरकारची चर्चा सुरु आहे. लवकरच इथे खाणकाम सुरु होणार आहे.
एजन्सीच्या अहवालानुसार, अतिरिक्त मुख्य सचिव सह खाण आयुक्त हरजोत कौर बम्हरा यांनी सांगितले की, GSI च्या निष्कर्षांचे विश्लेषण केल्यानंतर, चर्चेची प्रक्रिया सुरू झाली, ज्यामध्ये जमुई जिल्ह्यातील करमाटिया, झाझा आणि सोनोसारख्या भागात सोन्याचा मोठा असल्याचे म्हटले जात आहे.
या खाणीची सध्या चांगलीच चर्चा आहे बिहारच्या या भागात खाण शोधण्यास सुमारे ४० वर्षे लागल्याचे म्हटले जात आहे. अशात या ठिकाणी सोन्याची खाण सापडण्याचे कारणही खुप खास आहे. ही खान मुंग्यांमुळे सापडली असल्याचे म्हटले जात आहे.
चाळीस वर्षांपूर्वी या परिसरात एक मोठा वृक्ष होता असे म्हटले जात होते. उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी मुंग्या वड्याच्या झाडाखाली वारुळ बनवायची. मुंग्यांनी खालून माती उचलण्यास सुरुवात केली. तेव्हा तिथल्या लोकांना मातीत पिवळ्या धातूचे कण मिळाले होते. त्यानंतर या भागाबद्दल सर्वांना माहिती मिळाली आणि सोन्याची खाण असल्याची चर्चा सुरु झाली होती.
दरम्यान. केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या वर्षी लोकसभेत माहिती दिली होती की, भारताच्या सोन्याच्या साठ्यात बिहारचा वाटा सर्वात जास्त आहे. प्रल्हाद जोशी यांनी सांगितले होते की, बिहारमध्ये २२२.८८ दशलक्ष टन सोने बिहारमध्ये आहे.
बिहारमध्ये सापडलेले सोने देशाच्या एकूण सोन्याच्या साठ्याच्या ४४ टक्के आहे. राष्ट्रीय खनिज यादीनुसार, १ एप्रिल २०१५ पर्यंत देशात ६५४.७४ टन सोन्याचा साठा आहे. पण आता बिहारमध्ये सोन्याचा साठा मिळाल्यामुळे भारताच्या सोन्याच्या साठ्यात वाढ होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
शर्यत भरवली भाजपच्या लांडगेंनी पण घाटात जलवा मात्र राष्ट्रवादीच्या शेळकेंचाच; बोलेरोही त्यांनीच पटकावली
सिद्धू मुसेवालाच्या कुत्र्यांनीही सोडले खाणेपिणे; मुक्या जीवाचा व्हिडीओ पाहून डोळ्यांत अश्रू येतील
कोल्हापूरच्या तरुणांना गोव्यात बेदम मारहाण; स्वस्तात जेवनाचे आमिश दाखवून लुटले पैसे अन् दागिने