बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. नालंदा येथील एका सभेत एक बॉम्बस्फोट झाल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. जनसंवाद कार्यक्रमादरम्यान हा बॉम्बचा स्फोट झाला. गेल्या १५ दिवसांत दोनवेळा त्यांच्या सुरक्षेत मोठी चुक झाल्याची माहिती समोर आली आहे. (bihar cm event bomb blast)
यापूर्वी २७ मार्च रोजी पाटणा येथील बख्तियारपूरमध्ये नितीश कुमार यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री नितीश कुमार सातत्याने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत, या संदर्भात ते नालंदा येथे होते, जिथे बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या घटनेत नितीशकुमार पूर्णपणे सुरक्षित आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत गेल्या काही दिवसांपासून कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नालंदा येथे त्यांच्या कार्यक्रमावर बॉम्ब फेकण्यात आला आहे. नितीश कुमार यांच्या जनसंवाद कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. सिलाओ येथील गांधी हायस्कूलमध्ये जनसंवादाचा हा कार्यक्रम सुरू होता.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापासून अवघ्या १५ ते १८ फूट अंतरावर बॉम्बचा स्फोट झाला. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या एकच गोंधळ उडाला होता. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी एका व्यक्तीला पकडले आहे. तसेच पोलिस या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
नालंदापूर्वी २७ मार्च रोजी पाटणा येथील बख्तियारपूरमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला झाला होता. मुख्यमंत्री नितीश कुमार एका रुग्णालयात गेले होते. तेथे ते एका पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत होते. तेवढ्यात एक मुलगा आला होता आणि त्याने त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला होता.
त्यावेळी त्या तरुणाने गार्डला धरून सीएम नितीश कुमार यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्या तरुणाला ताब्यात घेतले होते. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला होता. जो चांगलाच व्हायरल झाला होता. नंतर हल्लेखोर मानसिक अस्वस्थ असल्याचे सांगण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या-
लग्नाचे स्वप्न दाखवून मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या DSP वर योगींनी केली कडक कारवाई, वाचा सविस्तर..
स्वतःच्या मुलीसोबत रोमान्स करताना दिसला गणेश आचार्य, कॅमेऱ्यासमोर करू लागला ‘हे’ कृत्य
राज ठाकरेंचा ‘हिंदुजननायक’ असा उल्लेख करत काश्मिरी पंडितांकडून बॅनरबाजी, जम्मूत सभेचे थेट प्रक्षेपण करणार