राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेने हा मोठा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. महासंघाने सुचना दिल्या होत्या की, 15 ते 23 वयोगटातील कुस्ती स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने करावं.
या स्पर्धा सुचना देऊनही घेण्यात आल्या नव्हत्या. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही भारतीय कुस्ती संघटनेकडून बरखास्त करण्यात आली आहे अशी माहिती मिळाली आहे. दिल्लीत संघटनेची वार्षिक सभा झाली. या सभेत हा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसात लवकरच हंगामी समितीची निवड करण्यात येणार आहे.
जिल्हा संघटनांनी आणि काही पैलवानांनी भारतीय कुस्ती संघटनेकडे तक्रारी केल्या होत्या. भाजपचे खासदार बृजभूषण सिंग हे भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि विनोद तोमर या संघटनेचे सचिव आहेत. तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष असून बाबासाहेब लांडगे हे सचिव आहे.
बाबासाहेब लांडगे हे 40 वर्षांहून अधिक काळापासून या संघटनेचे सचिव राहिले आहेत. बाबासाहेब लांडगे यांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर काही पैलवानांनी त्यांच्याविरोधात पुण्यात आंदोलनही केेलं होतं. मग हे प्रकरण थेट भारतीय कुस्तीगीर संघटनेकडं गेलं.
या बरखास्तीनंतर नव्याने निवडणूक होणार आहे. त्यांनतर कुस्तीगीर परिषद गठीत करण्यात येणार असून असे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचे आयोजनही कुस्तीगीर परिषदेतर्फेच केले जाते. दरम्यान, शरद पवार आणि बृजभुषण सिंह यांचे चांगलेे संबंध आहेत तरीही ही कारवाई करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
बृजभुषण सिंह हे काही दिवसांपुर्वीच चर्चेचा विषय ठरले होते. राज ठाकरेंनी काही दिवसांपुर्वी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. त्यानंतर बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि तरच अयोध्येत यावं अशी त्यांची मागणी होती.
महत्वाच्या बातम्या
अखेर शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; वाचा कॅबिनेटमध्ये कुणाची लागणार वर्णी
नुपूर शर्माला पाठिंबा दिल्यामुळे अमरावतीत भरचौकात व्यवसायिकाची हत्या, राज्यात खळबळ
मुख्यमंत्र्यांनी प्रोफाईल फोटो बदलताच जिव्हारी लागणाऱ्या कमेंट्सचा पाऊस, लोकं म्हणाले ह्या गद्दाराला…
शिंदेंची शिवसेना पक्षनेते पदावरुन हकालपट्टी नाहीच; ‘त्या’ व्हायरल पत्रामुळे संभ्रम वाढला






