Share

मोठा खुलासा, केकेच्या ह्रदयाभोवती तयार झाला होता फॅटी लेअर, शरीरात सापडली १० प्रकरची औषधं

केकेच्या निधनानंतर सर्वांनाच हादरवून सोडले आणि अनेक प्रश्न मागे सोडले. यापूर्वी त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आढळल्याने पोलिसांनी ‘असामान्य’ मृत्यूची नोंद केली.

यानंतर तो ज्या ठिकाणी काम करत होता, तेथील व्यवस्थापकावर अनागोंदीचे आरोप झाले होते. दरम्यान, केके यांना हार्ट ब्लॉकेजची समस्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेळेवर सीपीआर दिला असता तर त्याचा जीव वाचू शकला असता. आता या प्रकरणी एक मोठे अपडेट समोर आले आहे.

KK चे पोस्टमॉर्टम आणि व्हिसेरा रिपोर्ट हिस्टोपॅथॉलॉजिकल चाचण्यांसाठी पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये असे दिसून आले की त्याच्या हृदयाभोवती फॅटी लेयर तयार झाला होता, जो पांढरा झाला होता आणि व्हॉल्व्ह पूर्णपणे कडक झाले होते. पोलिसांनी सांगितले की  हिस्टोपॅथोलॉजी टिश्यूज संबंधित असा अभ्यास आहे की, ते ब्लॉकेज रिवील करतं.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्रदयात कालांतराने स्टिफनेस म्हणजे कठोरता निर्माण होते. त्यामुळे, पोस्टमॉर्टम आणि व्हिसेरा अहवाल हिस्टोपॅथॉलॉजिकल चाचणीसाठी पाठवला जाईल, ज्यामुळे ब्लॉकेज उघड होईल. पोलिसांनी सांगितले की, केकेच्या शरीरात गॅस्ट्रिक आणि यकृत आणि व्हिटॅमिन-सीशी संबंधित 10 वेगवेगळी औषधे आढळून आली आहेत, ज्यामध्ये अॅसिडिटी, पोटात जळजळ आणि गॅस झाल्यानंतर लगेच आराम देणाऱ्या औषधांचा समावेश आहे.

त्याच्या शरीरात सापडलेल्या औषधांमध्ये काही आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांचा समावेश होता. एका पोलिस सूत्राने सांगितले की, “केके सतत अँटासिड गोळ्या वापरत असल्याचे निष्पन्न झाले. 31 मे रोजी सकाळी, त्याने त्याच्या व्यवस्थापकाला सांगितले की एनर्जी कमी वाटत आहे.

त्याच रात्री, त्याच्या मृत्यूच्या काही तास आधी, त्याने आपल्या पत्नीला सांगितले की त्याला त्याच्या खांद्यावर आणि हातामध्ये वेदना होत आहे. दरम्यान, गुरुवारी न्यू मार्केट पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी कोलकातास्थित ब्लॅकआयड इव्हेंट हाऊसच्या सेलिब्रिटी मॅनेजरची चौकशी केली, ज्याने केकेशी त्या कार्यक्रमासाठी गाण्यासाठी बोलले होते.

तो माणूस केकेसोबत होता आणि त्याचा व्यवस्थापक हितेश भट्टही कारमध्ये होता जेव्हा त्याला नजरल मंचच्या ठिकाणाहून हॉटेलमध्ये नेण्यात आले. इतवारी यादव असे या गाडीच्या चालकाचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याने सांगितले की केकेला हॉटेलमध्ये परत गेल्यावर अस्वस्थ वाटत होते.

विशेष म्हणजे गायक केके दोन दिवस कोलकाता येथे कार्यक्रमासाठी गेला होता. दुसऱ्या कॉन्सर्टमधील लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्याला प्रथम हॉटेल आणि नंतर रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याला वाचवता आले नाही. कोलकाता येथे तोफांची सलामी दिल्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले, तेथे 2 जून रोजी त्याला अंतिम निरोप देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या
एकनिष्ठ कार्यकर्ता! आपल्या नेत्याला विधानपरिषदेसाठी संधी मिळावी म्हणून लिहिलं रक्ताने पत्र; राज्यात चर्चा
धक्क्यावर धक्के! हार्दिक पटेलची फोडाफोडीला सुरवात, ‘या’ बड्या काँग्रेस नेत्याला आणले भाजपमध्ये
२४ वर्षीय तरुणी करणार स्वत:शीच लग्न, हनिमुनलाही जाणार एकटीच; जाणून घ्या काय आहे प्रकरण
काश्मीरमधील हिंदूंना सरकारने बंदुकांचे चालवण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे; मनसेची सरकारकडे मागणी

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now