Share

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोलचे दर होणार कमी, सामान्यांना लवकरच मिळणार दिलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण असेल? याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं सगळ्यांना वाटलं. परंतू एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. हाच सर्वांसाठी मोठा धक्का होता. आता नव्या सरकारने अजून एक धक्का लोकांना दिलाय. (Big decision of Shinde government! Gasoline prices will be lower)

मुख्यमंत्री पदावर नव्याने विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात लवकरच पेट्रोलचे दर कमी केले जातील, अशी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे सामान्य नागरिक सुखावले आहेत. महाराष्ट्राची जनता अनेक महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे हैराण झाली होती.

भाजप आणि शिवसेनेतील शिंदे गट यांच्या आघाडी सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलवरील व्हॅट कमी केला जाणार, अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे आता इंधनदर कमी होऊन पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे.

नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिलाच निर्णय एवढा महत्त्वपूर्ण घेतल्याने सामान्य नागरिक त्यांचे फार कौतुक करताना दिसतायेत. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेल्या काही निर्णयांमुळे प्रभावित असल्याचे दिसते.

मागील काही दिवसांपूर्वी जीएसटी कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यात पंतप्रधान मोदी हे पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याविषयी ठोस असा मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता होती. त्यात केंद्र सरकार पेट्रोल डिझेलला जीएसटी कक्षात आणण्यास आग्रही होते, कारण त्यामुळे इंधन दर बराच कमी होऊन लोकांना दिलासा मिळेल.

पण राज्यांची सरकारे या निर्णयाला विरोध करतील कारण इंधनामुळे मिळणाऱ्या वित्तीय नफ्यात मोठी घट होईल,असं म्हंटल गेलं. परंतू भाजप पक्षाशी आघाडी करून स्थापन झालेल्या सरकारने हा निर्णय घेणे साहजिक आहे.

महत्वाच्या बातम्या-
आगीशी खेळू नका, नुपूर शर्माला अटक करा, तिला कठोर शिक्षा दिली जाईल, मुख्यमंत्री संतापल्या
राम रहिमचे झाले अपहरण, तुरूंगातून सुटका झालेला व्यक्ती आहे त्याचा डुप्लिकेट, याचिका दाखल
एकनाथ शिंदेंचे सरकार 6 महिन्यात पडणार? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण, म्हणाले..

इतर आर्थिक ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now