एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. शिंदे यांच्या समर्थानात असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. सध्या शिंदेशाही पर्वास राज्यात सुरुवात झाली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तसेच अशी चर्चा होती की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, पण देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन ही मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे सगळेच नेते हैराण झाले आहे. अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिंदे गटाला हाताशी घेऊन भाजपने हे नवं सरकार स्थापन केलं आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदेंनी आपल्या सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आपला फोटो बदलला आहे. शिंदे यांनी आपली माहिती देखील बदलली आहे. त्याचबरोबर फेसबुकवरती त्यांनी शिंदे यांनी आपल्या फोटोत बदल केल्यानंतर त्यांच्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
वाचा काय आहेत प्रतिक्रिया..?
विशेष बाब म्हणजे, काही नेटकऱ्यांनी शिंदे यांना अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छा आणि कमेंट केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. शिंदे हे गद्दार असल्याच्या कमेंट्स देखील काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत. समिश्र अशा प्रतिक्रिया या फोटोवर आल्या आहेत.
त्याचबरोबर ‘CMO MAHARASTRA’ या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत फेसबूक पेजवरती शिंदे यांचा फोटो अपलोड केल्यापासून त्यांच्यावरती कमेंट्सचा पाऊस पडत आहे. “मा. उद्धवसाहेबांसारख्या सहृदय माणसाला दुःख देऊन कुणी सुखी होऊ शकत नाही”. “आम्ही सदैव सोबत….फक्त मा.उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे”, अशा पद्धतीच्या कमेंट्स आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘भविष्यात असे प्रकार नको’; ज्यांनी साथ दिली त्यांनाच मुख्यमंत्री शिंदेंनी खडसावले, वाचा नक्की काय प्रकरण..?
उद्धव ठाकरेंचे निरोपाचे शेवटचं भाषण तुमच्या पोरा बाळांना दाखवा, कारण…
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यामागे ‘धर्मवीर’ चित्रपटाचा मोठा हात; चित्रपटात नेमकं असं काय होतं वाचा सविस्तर
एक साधा रिक्षाचालक कसा बनला राज्याचा मुख्यमंत्री? जाणून घ्या एकनाथ शिंदेंचा संघर्षमय प्रवास