भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज डेव्हिड मिलरबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या T20 सामन्यापूर्वी भुवनेश्वर कुमारला डेव्हिड मिलरबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत तो गंमतीने म्हणाला की, दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रोटीज संघाने खेळवलेच नाही पाहिजे.
पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विजयात डेव्हिड मिलरचा सर्वात मोठा वाटा होता. त्याने भारतीय गोलंदाजांविरुद्ध जोरदार धावा केल्या आणि भरपूर चौकार आणि षटकार मारले. भारतासमोर 212 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड मिलरने केवळ 31 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 64 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याने येथेही आयपीएलचे रूप दाखवले.
भुवनेश्वर कुमारच्या मते, मिलर इतका जबरदस्त फॉर्ममध्ये आहे की त्याच्यासमोर गोलंदाजी करणे खूप कठीण आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्याला दुसऱ्या टी-२० सामन्यातून वगळावे असे त्याला वाटते. तो म्हणाले, डेव्हिड मिलरसाठी गोलंदाजी करणे कठीण काम आहे. तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
दक्षिण आफ्रिकेने त्याला वगळावे असे मला वाटते पण तसे होणार नाही. मिलरने आयपीएलमध्ये चांगली फलंदाजी केली आणि त्याच्याकडे किती प्रतिभा आहे हे आम्हाला माहीत आहे. त्याच्यासाठी गोलंदाजी करणे हे मोठे आव्हान असेल. दिल्लीत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 गडी राखून पराभव केला.
प्रथम खेळताना भारतीय संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 211 धावांची मोठी मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना दक्षिण आफ्रिकन संघाने 20 व्या षटकात 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. दरम्यान, भुवनेश्वर कुमारने जर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात पॉवरप्लेदरम्यान विकेट घेतले तर तो T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल.
या गोष्टीत तो न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊथी आणि वेस्ट इंडिजचा लेगस्पिनर सॅम्युअल बद्री यांना मागे टाकेल. आतापर्यंतच्या या विक्रमांच्या यादीत वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री पहिल्या क्रमांकावर तर न्यूझीलंडचा टीम साऊथी दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोघांच्या नावावर 33-33 विकेट आहेत.
त्याचबरोबर भुवीच्या नावावर 33 विकेट्स आहेत. मात्र, या सर्वांमध्ये केवळ भुवनेश्वरच आहे, ज्याने पॉवरप्लेमध्ये 6 पेक्षा कमी इकॉनॉमीसह धावा दिल्या आहेत. भुवीने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 59 डावांमध्ये 5.66 च्या इकॉनॉमीने 33 विकेट घेतल्या आहेत. या सर्व कारणांमुळे भुवीला गोलंदाजी करताना पाहणे मोठा क्षण असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
सापासारखे सरपटणारे एलियन्स पृथ्वीवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात; वैज्ञानिकांनी दिला ‘हा’ इशारा
एवढ्या दोन वर्षात सुशांतच्या मृत्युचा तपास कुठपर्यंत पोहोचला? मुख्य आरोपी आता काय करतायत?
“..त्यावेळी मी संजय दत्तच्या झिंज्या उपटल्या आणि खाड खाड कानाखाली वाजवल्या”
‘असं करून तुम्ही पवारांची प्रतिष्ठा कमी करताय’, हायकोर्टाने मुंबई पोलिसांना झापले; वाचा नेमकं प्रकरण काय..






