‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी भाजप खा. ब्रिजभूषण सिंह यांनी दिली होती. यानंतर राजकारण चांगलंच तापलं. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार की नाही? अशी चर्चा सुरू होती.
अखेर राज यांनी दौरा स्थगित केला आहे. राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलंय की, ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित, महाराष्ट्र सैनिकांनो या.. यावर सविस्तर बोलू,’ असं ट्विट सध्या राज ठाकरेंनी केलं आहे. तर आता यावर ब्रिजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
याबाबत बोलताना खासदार ब्रिजभूषण सिंह म्हणतात, ‘राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला असला तरी माझा शरयू स्नानाचा कार्यक्रम 5 जून रोजी होणारच आहे. आम्ही त्यादिवशी साधू-संतांच्या उपस्थितीत शरयू स्नान करू,’ असं त्यांनी स्पष्टच सांगितलं आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना ब्रिजभूषण सिंह म्हणतात, ‘आता राज ठाकरे अयोध्येत येणार नसल्याने आम्ही आणखी उत्साहात कार्यक्रम साजरा करू. आम्ही 5 जूनला आमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवसही धुमधडाक्यात साजरा करू,’ असेही त्यांनी म्हंटलं आहे.
तर दुसरीकडे यावरुन आता आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहे. याचाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊतांनी “अयोध्या दौऱ्यासाठी त्यांनी मदत मागितली असती, तर आम्ही सहकार्य केलं असतं”, असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. यावर आता मनसेने सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसेनेला खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. “जो नेता राष्ट्रहितासाठी पंतप्रधानांवर टीका करताना कचरत नाही, तो नेता एका खासदाराच्या बडबडण्याने आपला निर्णय बदलेल का? असा संतप्त सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘जो नेता पंतप्रधानांवर टीका करताना घाबरत नाही, तो एका खासदाराच्या बडबडण्याने निर्णय बदलेल का?’
भाजपचा बडा नेता अडचणीत; मयताजवळ आढळलेल्या चिठ्ठीतून झाला खळबळजनक खुलासा
आता अण्णा हजारेंच्या विरोधातच होणार आंदोलन; ढोल बजाव, अण्णा हजारे जगाओ आंदोलनाची घोषणा
काश्मिरी दहशतवादी यासिन मलिकला फाशी होणार कळताच पाकिस्तान संतापला, म्हणाला…