Share

नुपूर शर्मा यांची जीभ कापून आणणाऱ्याला…; भीम आर्मीने केली मोठी घोषणा

काही दिवसांपूर्वी एका टिव्ही शोमध्ये बोलत असताना भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नुपूर शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशभरात गदारोळ माजला. सहा वर्षांसाठी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. (bhim army gift 1 crore to who attack on nupur sharma)

तसेच भाजप दिल्ली मीडियाचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याचबरोबर मुस्लिम समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. प्रेषित पैगंबर यांच्याविषयीच्या वादग्रस्त विधानानंतर नुपूर शर्मा यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

अशातच या वादात आता भीम आर्मीने उडी घेतली आहे. नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा भीम आर्मीने केली आहे. भीम आर्मीचे प्रमुख नवाब सतपाल तन्वर यांनी ही घोषणा केली आहे. तसेच कानपूर हिंसाचाराची सुत्रधार नुपूर शर्मा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

नुपूर शर्मा यांनी पैगंबराचा अपमान केला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील करोडो लोक दुखावले गेले आहे. मोदी सरकार मुद्दाम नुपूर शर्माला अटक करत नाहीये. नुपूर शर्मा ही कानपूर दंगलीची खरी सूत्रधार आहे. योगी सरकारने त्यांना आरोपी का बनवले नाही? असा सवालही नवाब सतपाल तन्वर यांनी उपस्थित केला आहे.

तसेच नुपूर शर्मासारख्या नेत्याला समाजात राहण्याचा अधिकार नाहीये. त्यांना तात्काळ तुरुंगात पाठवायला हवे, नाहीतर त्यांना देशातून हाकलून द्यायला पाहिजे. नुपूर शर्मांच्या वक्तव्यामुळे भारताची जगभरात बदनामी होत आहे, असेही सतपाल तन्वर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नुपूर शर्मांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हा मुद्दा इतका पेटला आहे की जागतिक पातळीवर पोहोचला आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर अनेक मुस्लिम देशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक देशांनी भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-
फोडाफोडीला सुरवात! भाजपच्या महाडिकांनी केला मोठा गेम, शिवसेना आमदारांना ठेवलेल्या हॉटेलात जात..
PUBG खेळू दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलाने गोळ्या झाडून केला आईचा खून, वाचून बसेल जबर धक्का
शत्रुघ्न सिन्हा यांनी शाहरुखवर लावला गंभीर आरोप, म्हणाले, ‘तो मला थॅंक्यु सुद्धा नाही म्हणाला’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now