Share

VIDEO: अजान सुरु झाली अन् इकडनं भीम जयंतीच्या मिरवणूकीचा डीजे आला; पहा पुढे काय घडलं…

१४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती महाराष्ट्रासह देशभरात साजरी झाली. देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मिरवणूका निघाल्या थाटामाटात संपूर्ण जयंती साजरी झाली. (bheem jayanti at chembur viral video)

अशात एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चेंबूरमधून एक सामाजिक सलोखा जपणारी घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे. मिरवणूकीत डीजे सुरु असताना अचानक अजानचा आवाज येतो, त्यामुळे जोरजोराने वाजत असलेला डीजे थांबवण्यात येतो अशी ही घटना आहे.

आंबेडकर जयंतीची मिरवणूक निघाली होती. त्यावेळी मिरवणूकीत डीजे वाजवला जात होता.अशातच अचानक अजान सुरु झाली. ती अजान ऐकू येताच मिरवणूकीतील काही लोकांनी पुढाकार घेतला आणि चालू असलेला डीजे थांबवला. अजान सुरु असेपर्यंत डीजे बंद करण्यात आला होता.

https://twitter.com/IMRahilMohammed/status/1514693620989050880

चेंबूरमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ नक्की कुठला असं प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित व्हिडिओ हा चेंबूरच्या महात्मा फुले नगर नंबर १ मधला आहे. तिथे मिरवणूक निघाली असून ती पी एल लोखंडे मार्गावर आली असताना अजानक सुरु झाली होती.

तिथे एका मशिदीमध्ये काही मुस्लिम बांधव प्रार्थना करत होते. त्यावेळी अजान सुरु असल्यामुळे डीजे बंद करण्यात आला. तसेच सर्वांना सामाजिक सलोखा जपण्याचं आवाहनही केलं गेलं. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, राज्यात मशिदींवरील भोंग्यावरुन वाद सुरु आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त एक भाषण केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, मशिदींवरील भोंगे काढून टाका. तसेच राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत भोंगे काढण्याचा अल्टिमेटम दिला आहे. ३ मेपर्यंत भोंगे काढले नाही, तर मनसे स्टाईल हनूमान चालिसा लावून उत्तर देऊ, असे राज ठाकरे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-
किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, राऊत उघड करणार ‘ते’ घोटाळा प्रकरण, ट्विट करत म्हणाले..
आलियापेक्षा वरचढ निघाल्या सासू ननंद, लग्नातील लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पहा फोटो
‘मेरी आवाज हिंदुस्थान की आवाज’, पोलिस कोठडीतून बाहेर येताच सदावर्तेंनी दिल्या मोठमोठ्याने घोषणा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now