Share

शिंदे गटाशी जुळवून घेण्याचा सल्ला देणाऱ्या भावना गवळी शिंदे गटात सामील; पंधरा दिवसांत भूमिका बदलली

bhavna gavali

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्के बसत आहेत. पक्षाला लागलेली गळती थांबण्याच नाव घेत नाहीये. अनेकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे.

अनेक जवळच्या व्यक्तींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. यवतमाळमध्येही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी आता शिंदेंना समर्थन दिले आहे. भावना गवळी यांचा आख्खा गट शिंदे यांच्या गटात अधिकृतरित्या सामील झाला आहे.

आगामी निवडणुकांच्या तोंडावरच शिवसेनेला धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भावना गवळी यांच्या सोबत 8 नगरसेवक आणि 30 पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येते आहे. विशेष बाब म्हणजे, बाभूळगाव नगर पंचायतीचे नगरसेवक, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, युवासेना जिल्हा प्रमुख आणि असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत.

या सर्वांनी शिंदे गटाचे निरीक्षक राजेंद्र फाटक यांच्या उपस्थितीत शिंदेंना समर्थन देत असल्याची माहिती दिली. विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घ्यावे असा सल्ला पत्र लिहून खासदार भावना गवळी यांनी दिला होता. मात्र आता त्यांच्या भूमिकेत बदल झालेला पाहायला मिळत आहे.

दरम्यान, संजय राठोड यांच्या समर्थकांनी देखील शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आणखी उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. नुकत्याच यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेत नवीन पदाधिकारी नियुक्त्या झाल्या होत्या.

मागील आठवड्यात भावना गवळी यांची लोकसभेतील पक्ष प्रतोदपदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं. या पत्रात भावना गवळी यांना प्रतोद पदावरून हटवण्याची मागणी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या
‘एसटी बस नदीच्या पाण्यात नाही, तर…’, वाचा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला अपघाताचा थरार…
रामदास कदमांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र! उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत म्हणाले…
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरून मतदानासाठी दाखल; सोशल मीडियावर हळहळ
महाराष्ट्रातील एसटी बसला मध्य प्रदेशात भीषण अपघात; अपघाताचा थरार वाचून उभा राहील अंगावर काटा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now