राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात आक्रमक शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. आक्रमक शिवसैनिकांनी थेट उद्धव ठाकरेंनाच अल्टिमेटम दिला आहे. यामुळे शिवसेनेपुढील अडचणी आणखीनच वाढलेल्या पाहायला मिळत आहे.
अलीकडेच शिवसेना खासदार भावना गवळी यांची लोकसभा प्रतोद पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी खासदार राजन विचारे यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र शिवसेना राऊत यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांना दिले आहे.
राऊत यांच्या याच निर्णयाविरोधात आता गवळी समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. रस्त्यावर उतरत गवळी समर्थकांकडून थेट आंदोलन देखील करण्यात आले आहे. अचानक भावना गवळी यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आता त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत.
भावना गवळी यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट उद्धव ठाकरेंकडे राजीनामे पाठविले आहेत. यामुळे आता वाशिममध्ये देखील शिवसेनेला भगदाड पडणार असल्याच बोललं जातं आहे. यावर अद्याप उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना रिसोड तालुकाप्रमुख महादेव ठाकरे, रिसोड शहर प्रमुख अरुण मगर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप मोरे, युवा सेना तालुकाप्रमुख गजानन अवताडे, महिला आघाडी प्रमुख संध्या सरनाईक,अतुल पवार,अनिताताई इंगळे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
याबाबत बोलताना या पदाधिकाऱ्यांनी म्हंटलं आहे की, जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीमध्ये आम्हाला कुठेही शिवसेना पक्षाची मदत झालेली नाही. याचबरोबर भावना गवळी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई मागे घ्यावी, अनथ्या आमच्या पदांचे राजीनामे मंजूर करावेत, असा अल्टिमेटम या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
एकनाथ शिंदेंकडून अब्दुल सत्तारांना बंडखोरीचे गिफ्ट, सत्तार म्हणाले, ‘ही मामुली गोष्ट नाही..’
…तेव्हा उद्धवसाहेब एकदाही बोलले नाहीत हा माझा आमदार आहे; बंडखोर आमदाराने पहिल्यांदाच व्यक्त केली नाराजी
वेस्ट इंडिज सिरीजमध्ये विराटचे नाव का नाही? स्वतः विराटच आहे याला जबाबदार, झाला मोठा खुलासा
इम्रान हाश्मीने कॉफी विथ करणमध्ये व्यक्त केली इच्छा, म्हणाला, मला दिपीकासोबत…