Share

narayan rane : भाजपच्या घराघरात निरमा पावडरचा कारखानाच तयार झाला आहे; शिवसेनेने भाजपला पाडले उघडे

fadanvis

narayan rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे हे सातत्याने शिवसेनेला लक्ष्य करताना पाहायला मिळत आहे. राणे पिता – पुत्र थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जहरी शब्दात निशाण्यावर घेत असल्याचं देखील अनेकदा आपण पाहिल आहे. राणे आणि ठाकरेंमधील वाद काही केल्या थांबण्याच नाव घेतं नाहीये.

सतत राणे पिता – पुत्र ठाकरेंना लक्ष्य करताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे सिंधुदुर्गातील आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ आज कुडाळमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

नारायण राणेंना आमदार भास्कर जाधव यांनी चांगलेच धारेवर धरले. यामुळे आता राणे कुटुंबीय आणि शिवसेना यातील वाद आणखीनच टोकाला गेल्याच पाहायला मिळत आहे. जाधव यांनी राणे पिता-पुत्रांची नक्कल करत जहरी शब्दात त्यांच्यावर निशाणा साधला.

वाचा भास्कर जाधव यांनी काय म्हंटलंय?
जाधव म्हणतात, राणे सारखे बोलतात की, ‘मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दिलं आणि शिवसेना संपली’. आहो नारायण राणे.. शिवसेना संपली म्हणताय.. ३९ वर्ष शिवसेनेसाठी काम केलं म्हणता.. मग एवढी वर्षं काय दाढ्या करत होतात?.’

पुढे बोलताना जाधव यांनी राणे यांची नक्कल करत म्हंटलं आहे की, ‘शिवसेनेनं काहीच केलं नाही, तर ३९ वर्ष काम करून मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेले तुम्ही काय म्हशी भादरत होता?” असा संतप्त सवाल जाधवांनी नारायण राणेंना लक्ष्य करताना उपस्थित केला आहे.

दरम्यान, नारायण राणेंचा जाधव यांनी ‘कोंबडीवाले’ असाही उल्लेख केला आहे. ‘आजही मंत्रीमंडळात बसलेले ५० टक्के लोक, मंत्रीमंडळाबाहेर आमदार असणाऱ्यांवर भाजपाकडून आरोप केले जात होते. मात्र तेच भाजपात गेले की स्वच्छ झाले. भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखानाच तयार झाला आहे,’ असं जाधव म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-
devendra fadanvis : फडणवीसांच्या खेळीमुळे आशिष शेलारांचा झाला गेम, भाजपने माघार घेतल्यामुळे पडले तोंडघशी
Sanjay Raut : माघार घेतली नसती तरी आम्ही जिंकलोच असतो, राऊतांनी थेट तुरूंगातून सांगीतला मताधिक्याचा आकडा
Shakti Kapoor : अभिनेत्रीचे शक्ती कपूरवर गंभीर आरोप, म्हणाली, बोल्ड सीन करताना तो एवढा उत्तेजीत झालता कि….

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now