Share

प्रत्येक वेळेस आव्हान देऊन चालत नाही; आमदार भास्कर जाधव संजय राऊतांवर भडकले

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४६ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारलाही धोका निर्माण झाला आहे. हे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहे. (bhaskar jadhav angry on sanjay raut)

शिवसेना नेते आमदारांना पुन्हा मुंबईत येण्याबाबत सांगत आहे. असे असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करुन सांगतो, आम्ही हार मानणार नाही, आम्ही जिंकणार, आमची संपूर्ण तयारी झाली. आता तुम्ही मुंबईतच येऊन दाखवा, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते खुपच आक्रमक झाल्याचे दिसले. विधानसभेत विश्वास ठराव आम्हीच जिंकू, या मंडळींनी खुप चुकीचं पाऊल उचललं आहे. आम्ही खुप समजवण्याचा प्रयत्न केला मात्र आता वेळ निघून गेली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांच्या या विधानानंतर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता, ही आव्हान द्यायची वेळ नाही. त्यांच्याशी संवाद साधा. त्यामुळे मतभेद कमी होतील. नेहमीच आव्हान देऊन काही होत नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

आपले आमदार नाराज का आहेत? ते सोडून का गेलेत? आपले मंत्री का निघून गेले हे समजून घ्यायला पाहिजे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. तसेच मी तेव्हाही सांगितलं होतं की, आपल्या कोट्यातील मंत्रीपद कोणालाही देऊ नका. शिवसेनेने मुख्यमंत्री पद घेतले पण आपल्या कोट्यातील ३ मंत्रीपद अपक्ष आमदारांना का दिली? असा सवालही भास्कर जाधवांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी वर्षा निवासस्थान सोडले आहे. यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. पण शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, असे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-
धोका देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही; मुख्यमंत्र्यांनी ठणकावले
राज्यपालांना विधीमंडळात हस्तक्षेप करता येणार नाही; बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द होणार
VIDEO: टॉपलेस होऊन उर्फीने अंगावर गुंडाळली वायर, आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लुक पाहून चाहते घायाळ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now