Share

अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित्त भरत जाधवची खास पोस्ट; म्हणाले, त्यांच्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टी….

मराठी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे ७५ वर्षांचे झाले आहे. ४ जून रोजी त्यांनी आपला ७५ वाढदिवस साजरा केला आहे. ७५ व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर कलाकरांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. (bharat jadhav posted on ashok saraf)

अनेक कलाकारांनी त्यांच्याबद्दल आपले प्रेम व्यक्त केले आहे. काहींनी किस्से सांगितले आहे, तर काहींनी खास पोस्ट केल्या आहे. अशात प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांनीही एक खास पोस्ट लिहीत अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

भरत जाधव यांची पोस्ट-
एखाद्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन करायच असेल तर फक्त एका प्रश्नाचं उत्तर शोधावं की, ” ती व्यक्ती नसती तर..?? “अशोक सराफ यांच्याशिवाय मराठी चित्रपट सृष्टीची कल्पना सुद्धा कोणी करू शकत नाही इतकं मोठं योगदान त्यांचं आहे. या इंडस्ट्रीत नाव कमवायला खुप जण येतात पण अशोक मामा कमवायला नाही तर भरभरून देण्यासाठी आले.

एकेकाळी आख्खी मराठी सिने इंडस्ट्री जगवली या माणसाने. मी स्वतःला भाग्यवान समजतो की हिरो म्हणून पदार्पण करत असताना पहिल्याच चित्रपटात अशोक मामांसोबत काम करण्याची संधी मिळाली. व पुढेही अनेक सिनेमातून आम्ही एकत्र काम केलं.

अशोक सराफ यांच्या सारखी माणसं ही दिपस्तंभासारखी असतात. त्यांच्याकडे पाहतं रहावं…त्यांच्याकडून शिकतं रहावं आणि आपली वाटचाल करत रहावी..!अशोक मामा म्हणजे Man with The Midas Touch… त्यांनी ज्या ज्या भूमिकांना हात लावला त्याचं सोन झालं.

अशा या अभिनयाच्या अनभिषिक्त सम्राटास ७५ व्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि हे ७५ वय वगैरे इतरांसाठी.. आजही ते रंगभूमीवर ज्या सफाईने वावरतात…त्यांच्या अफाट एनर्जी व उत्साहासमोर ते वय अगदीच ‘अतिसामान्य’ आहे.

महत्वाच्या बातम्या-
…म्हणून केके कधीच व्हाट्सअप वापरत नसे, क्लोज फ्रेंड शंकर महादेवनने सांगितल्या केकेच्या खास आठवणी
केतकी प्रकरणात राज्यपालांची एंट्री, केस CBI कडे जाण्याची शक्यता; वाचा नेमकं काय घडलं..
करण जोहरची वाढदिवसाची पार्टी ठरली सुपर- स्प्रेडर; तब्बल ५५ जणांना करोनाची लागण

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now