राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांचं एक भाषण प्रचंड व्हायरल झालं होतं ज्यामध्ये त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याआधीही ते बऱ्याच वेळा त्यांच्या वक्तव्यांमुळे अडचणीत सापडले आहेत. आता त्यांनी मुंबईबाबत एक वक्तव्य केलं होतं ज्यामुळे ते वादात सापडले होते.
पुर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर सडकून टिका होत होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासहित अनेक नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. राज्यपालांच्या या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असं भाजपने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्पष्ट केलं होतं.
एवढं सगळं झालं तरी त्यांच्यावरील लोकांचा रोष काही कमी होत नव्हता. लोकांनी टिकेची झोड उठवल्यानंतर राज्यपालांनी आता माफी मागितली आहे. त्यांनी मुंबईबद्दलचे वक्तव्य मागे घेत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक काढले आहे.
त्यांनी आपल्या माफीनाम्यात लिहीलं आहे की, दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून काही चुक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपुर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखणीय असे योगदान आहे.
विशेषत: संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्ज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांत राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतकरणाचा पुर्नप्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो. भगत सिंग कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र, असा माफीनामा त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
गुंतवणूकदारांना सुगीचे दिवस! 33 रूपयांचा शेअर पोहोचला 3 हजारवर, 1 लाखाचे झाले 94 लाख
Digpal lanjekar: ‘मी नकळत मोहनजींच्या पाया पडलो’, पावनखिंडच्या दिग्दर्शकाने सांगितला रेशीमबागेतील अनुभव
“संजय राऊत यांच्या नंतर आता शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता देखील जाणार तुरुंगात”
Driving job: ड्रायव्हरसाठी सुवर्णसंधी! जर तुम्हाला ड्रायव्हींग येत असेल तर मिळेल ६३ हजार पगार; ‘असा’ करा अर्ज