Share

Health : ‘हे’ आहेत पाया सुप पिण्याचे आरोग्यदायी फायदे; वाचून चकीत व्हाल

Health: तुम्हाला मटन बिर्याणी आणि मटण ग्रेव्ही खाण्याचा कंटाळा आला आहे का? आला असेल तर काहीतरी नवीन करून पहा जे तुमच्या अन्नाची चव वाढवेल. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला मटण आवडत असेल तर तुम्ही त्यांना मटण पाया सुप बनवून देऊ शकता. पाया सुप बनवायला थोडा वेळ लागतो पण एकदा करून बघितला तर तुम्ही त्याची चव कधीच विसरणार नाही. तुम्हाला माहीत आहे का पाया सुप पिण्याचे काय फायदे आहेत? चला तर मग जाणून घेऊया…

या बोन-इन सूपमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. तसेच भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, सूपचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करता येते. गेल्या काही वर्षांत पाया सुप खूप लोकप्रिय झाले आहे. कारण या सुपच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. वजन कमी करण्यापासून ते पचनक्रिया मजबूत करण्यापर्यंत हे सुप फायदेशीर ठरू शकते.

पाया सूप प्यायल्याने सुुज कमी होऊ शकते. हाडांच्या मटनाचा रस्सा पिल्याने जळजळ कमी होते. या व्यतिरिक्त, त्यात असलेले एल-ग्लुटामाइन आपल्याला आतड्याची जळजळ कमी करण्यास मदत करते. इतकेच नाही तर या सुपमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे तुम्हाला सर्दीची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

पाया सुप गर्भवती महिलांसाठीही खूप फायदेशीर ठरू शकते. त्याच्या वापराने हाडे, पचनसंस्था आणि गर्भाचा विकास चांगला होतो. इतकंच नाही तर गर्भधारणेदरम्यान उलट्या आणि मळमळ यासारख्या सामान्य समस्यांपासून बचाव करण्यासाठी हे सुप तुम्हाला मदत करू शकतो.

यामध्ये असलेले पोषक तत्व गरोदरपणात होणाऱ्या सर्व समस्यांपासून आराम देतात. गर्भवती महिलांसाठी हे खूप फायदेशीर आहे, कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे असतात. तसेच हे सुप पिल्याने गरोदर मातेचे दुध वाढण्यास मदत होते. पाया सुप कॅल्शियम, प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन डी सारख्या घटकांनी समृद्ध आहे.

या सुपमध्ये मांस आणि हाडे यांचे मिश्रण असते. शरीरात कॅल्शियमसह या पोषक तत्वांचा पुरवठा करुन हे सुप हाडे मजबूत करते. तसेच, तुमचे दात देखील खूप मजबूत होऊ शकतात. हे सुप तयार करण्यासाठी प्राण्यांची हाडे वापरली जातात. हेल्दी ड्रिंक म्हणून तुम्ही पाय सुप देखील पिऊ शकता. बकरी, कोकरू, कोंबडी किंवा मासे अशा कोणत्याही प्राण्याच्या हाडांपासून पाया सुप तयार केले जाते.

महत्वाच्या बातम्या-
Rahul Dravid : भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्येही खेळण्याची परवानगी दिली पाहीजे; पराभवानंतर द्रविडची मागणी
Cricket: घरात एकच बाप असावा, सात सात बाप असतील तर..; जडेजाची टिका रोहीत शर्माला झोंबणार
शामी-भुवीच्या निष्काळजीपणावर संतापला रोहित; चालू मॅचमध्येच झाप झाप झापले, व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now