रशिया-युक्रेन युद्धादरम्यान शेजारील बेलारूसने मोठा निर्णय घेतला आहे. बेलारूसने घटनात्मक सार्वमत घेऊन आपला अण्वस्त्र नसलेला दर्जा रद्द केल्याची माहिती दिली आहे. यामुळे रशियन अण्वस्त्रे येथे आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करून युक्रेनवर दबाव वाढवेल अशी भीती निर्माण झाली आहे. (belarus in russia ukraine war)
याआधी रविवारी रशियाने न्यूक्लियर डेटरंट फोर्सला हाय अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त आले होते. अमेरिकेने पुतीन यांचे हे पाऊल अस्वीकार्य असल्याचे म्हटले होते. रशिया अण्वस्त्रे तैनात करेल अशी भीती जगातील इतर देशांमध्ये आधीच होती. याप्रकरणी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वत: बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला आणि रशियाला अशा प्रकारे मदत करू नका असे सांगितले होते.
बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्यास रशियाला हिरवा कंदील दाखवला आहे, असे आधीच कळले होते. त्यानंतर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा फोन केला होता आणि अशा प्रकारची मदत करु नका असे सांगितले होते. आता प्रत्येक मतावर बेलारूस रशियाच्या पाठीशी उभा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
युक्रेनकडूनही असाच काहीसा दावा केला जात आहे. युक्रेनच्या न्यूज वेबसाइट कीव इंडिपेंडंटनुसार, बेलारशियन पॅराट्रूपर्स युक्रेनच्या विरोधात तैनात करण्यात आले आहेत. हे पॅराट्रूपर्स इलुशिन इल-७६ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टद्वारे पाठवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सोमवारी पाचवा दिवस होता. रशियन सैन्य युक्रेनमधील विविध शहरे उद्ध्वस्त करून नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. राजधानी कीवपर्यंत पोहोचण्याचे रशियन सैन्याचे प्रयत्न शुक्रवारपासून सुरू आहेत, मात्र अद्यापपर्यंत त्यात यश आलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना सांगितले की, पुढील २४ तास युक्रेनसाठी खूप महत्त्वाचे आहेत.
दरम्यान, युक्रेनला इतर देशांकडूनही मदत मिळू लागली आहे. अमेरिका युक्रेनला ५०० स्टिंगर क्षेपणास्त्रे आणि शस्त्रे पाठवले आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत ३५२ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे, तर १६८४ लोक जखमी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
प्रेयसीची ‘ही’ मागणी पूर्ण न करू शकल्याने तरुणाने घेतला गळफास, व्हॉट्स ऍप चॅट पाहून पोलिसही हैराण
‘पुष्पा’ स्टाईल दारूच्या तस्करीचा प्रयत्न फसला, टँकर पाहून पोलिसही झाले अवाक
भारताच्या ‘या’ ऑल राऊंडरची प्रतिस्पर्धींना भीती; भारतीय संघ त्याच्याशिवाय वर्ल्ड कपमध्ये उतरणारच नाही