देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच गुजरातच्या भरुचमध्ये उत्कर्ष समारंभात बोलताना मोदी भावूक झाले. शासकीय योजनांच्या लाभार्थीच्या मुलीशी बोलताना मोदींच्या डोळ्यात पाणी आलं. व्हिज्युअली चॅलेंज्ड व्यक्तीच्या लेकीशी संवाद साधताना देशाचे पंतप्रधान मोदी गहिवरले.
अलीकडे गुजरात सरकारने राज्यात चार प्रमुख योजना राबविल्या आहेत. या योजनांमुळे गरीब गरजूंना आर्थिक मदत होणार असल्याच सांगितलं जातं आहे. याचाच ‘उत्कर्ष समारंभ’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थित होती.
या सभारंभात पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. यावेळी मोदींनी गुजरात सरकारच्या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना संबोधित केले. लाभार्थ्यांना संबोधित करताना मोदींनी एक खास किस्सा देखील सांगितला.
वाचा नेमकं पंतप्रधान मोदी म्हणाले काय…? मोदी सांगतात, काही दिवसांपूर्वी मला एक मोठे नेते भेटायला आले होते. पुढे मोदी सांगतात, राजकारणात त्यांनी अनेकदा आमचा विरोध केला. मात्र, मी त्यांचा नेहमी आदर करतो. काही बाबतीत ते माझ्यावर खूश नव्हते. म्हणूनच ते काही दिवसांपूर्वी मला भेटण्यासाठी आले होते.
मोदी पुढे सांगतात, भेटायला आलेले ते नेते मला म्हणाले, ‘मोदीजी, तुम्ही दोनदा देशाचे पंतप्रधान झाला आहात. आता अजून काय हवंय? कोणी दोनदा पंतप्रधान झाले तर सर्व काही मिळाले,’ हे त्यांचे मत होते. मात्र मी ते ऐकून घेतले आणि म्हणालो, ‘मी वेगळ्या धातूचा आहे.’
विशेष बाब म्हणजे मोदींनी त्या नेत्याचे नाव जाहीर केले नाही. मात्र अलीकडेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मोदींना भेटले होते. त्या वेळी पवारांनी केंद्राच्या एजन्सीबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे मोदींचा रोख पवारांकडे असल्याच बोललं जातं आहे.
दरम्यान, पुढे मोदी म्हणाले, ‘गुजरातच्या भूमीने मला घडवलं आहे. नरेंद्र मोदी कोणत्या धातूपासून बनले आहेत हे त्यांना माहीत नाही. कोणतेही काम कमी होत नसते हा माझा विश्वास आहे. तसेच आता विश्रांती घ्यावी, असे मला कधीच वाटत नाही, असेही सूचक विधान मोदींनी केले.
महत्वाच्या बातम्या :-
यासिन मलिकने गुन्हा कबूल केल्यानंतर अग्रिहोत्रींनी शशी थरूर-ट्विंकल खन्नावर साधला निशाणा, म्हणाले..
राहुल द्रविडचे पुस्तकाच्या दुकानातील फोटो व्हायरल, साधेपणा पाहून चाहते म्हणाले…
निवडणुकांआधी शिवसेनेने ठरवला ‘हा’ नवा फॉर्म्युला, पक्षातील नेते नाराज होण्याची शक्यता