Share

घरीच अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात UPSC पास; बीडच्या शेतकऱ्याची मुलगी राज्यात पहिली

बीड : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अनेक अडचणींचा सामना करून आपल्यासाठी तो शेती करतो. अशाच बीडच्या संघर्षशील शेतकऱ्याच्या मुलीने यूपीएससी परीक्षेत मोठे यश संपादन केलं आहे. घरीच अभ्यास करत तिने 36 व्या रँकवर येण्याचा बहुमान मिळवला आहे. श्रद्धा नवनाथ शिंदे असं तरुणीचे नाव असून श्रद्धाने युपीएससीच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत तिने देशात 36 वा रँक मिळविला आहे.

बीडमध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि घरी राहूनच अभ्यास करून, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाला गसवणी घालण्याची किमया बीडच्या कन्येने केली आहे. श्रद्धा यांचे वडील हे बीड तालुक्यातील लोणी शहाजानपूर येथील असून अल्पभूधारक शेतकरी आहेत. तर आई गृहिणी असून त्या अशिक्षित आहेत.

श्रद्धा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडलाच झाले. नंतर तिने औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रीकल इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण करुन 2018 साली अभियांत्रिकीची पदवी घेतली. तर याविषयी वडील नवनाथ शिंदे म्हणाले, की मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. लहानपणापासून श्रद्धाची जिद्द शिकायची होती, तिच्या शिक्षणासाठी मी खूप काही केलं असून तिने यामध्ये मोठे यश मिळवले आहे.

तसेच श्रद्धा हिला मी मुलाप्रमाणे सांभाळले आहे. मुलापेक्षा जास्त तिला मी समजत आहे. त्यामुळे खरंच असा भेदभाव करायची गरज नाही, लोक म्हणतात मुलगीचे वय 18- 20 झाले की लग्न करायचं, नको शिकवायचं. मात्र मी तसं केलं नाही. त्यामुळं आज माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे. अशी प्रतिक्रिया श्रद्धाचे वडील नवनाथ शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये आपलं आणि आपल्या जिल्ह्याचं नाव कोरलं आहे. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
सेक्स वर्कर सेक्सला नाही म्हणू शकते तर मग पत्नी का नाही? न्यायालयाचा गंभीर सवाल
‘फडणवीस गोव्यात व्यस्त आहेत मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा?’, रुपाली ठोंबरेंचा भाजपाला सवाल

इतर राज्य शिक्षण

Join WhatsApp

Join Now