Homeताज्या बातम्या'फडणवीस गोव्यात व्यस्त आहेत मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा?', रुपाली ठोंबरेंचा भाजपाला...

‘फडणवीस गोव्यात व्यस्त आहेत मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा?’, रुपाली ठोंबरेंचा भाजपाला सवाल

पुढील महिन्यात गोवा विधानसभेच्या निवडणूका आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच रंगताना दिसत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री ठाकरे यांनीही आपला मुख्यमंत्रीपदाचा चार्ज इतरांकडे द्यावा’ अशी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा चार्ज इतरांकडे द्यावा,अशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक ट्विट केलं आहे.

“महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते महाराष्ट्राच्या सोडून गोव्याच्या समस्या मांडत आहेत. फडवणीस गोव्यात व्यस्त असतील तर विरोधीपक्ष नेत्याचा चार्ज कुणाकडे द्यायला हवा? भाजपाच्या न्यायाप्रमाणे कुणाकडे द्यायला हवा…. “असा सवाल राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गोवा दौऱ्यावर होते.

“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं”, अशी टीका भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

“विरोधकांचं म्हटलं तर शरद पवारांचा पक्ष असा आहे की, पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा…, मग ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी तर कधी टीएमसीशी बोलतात. कारण ती काही राष्ट्रीय पार्टी नाही. त्यांचं काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, त्यांचे काही राष्ट्रीय विचारही नाही”, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादीतून प्रतिक्रिया उमटत आहेत. गोवा या राज्यावर सध्या भाजपाची सत्ता आहे. भाजपाला गोव्यातून हद्दपार करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.त्यामुळे गोवा विधानसभा निवडणूकीचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसून येत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
…त्या दिवशी सगळ्यांचाच बाजार उठेल; मराठी पाट्यांच्या निर्णयावरुन विश्वंभर चौधरी ठाकरे सरकारवर संतापले
बिपिन रावतांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला? अखेर सत्य आले समोर
राजकीय भूमिका नाही तर ‘या’ कारणामुळे किरण माने मालिकेतून बाहेर; निर्मात्यांनी सांगितलं खरं कारण

ताज्या बातम्या