चोर, दरोडेखोर म्हटले तर हत्यारे बाळगणारे, कधीही कोणावरही हल्ला करणारे चेहरे समोर येतात. अनेकदा दागिने आणि पैशांसाठी चोर कधी मारहाण, तर कधी शस्त्राने हल्ला करतात. मात्र बीडमध्ये एक असा चोर भेटला आहे, ज्याने सर्वांना हैराण केले आहे. (beed thief gulab bansode arrested)
बीडमध्ये एक असा चोर आहे जो लोकांना खाजगी दवाखान्यांजवळ भेटतो. तसेच ओळखीचा बहाणा करतो आणि जवळीक निर्माण करतो. इतकंच नाही, तर चहा पण पाजतो पण नंतर तो शेवटी लोकांचा खिसा खाली करुन पळून जातो. चोराने लढवलेल्या या शक्कलमुळे पोलिसही चक्रावले आहे.
गुलाब बनसोडे (४०) असे या चोराचे नाव आहे. तो अंबेजोगाईतील राडी तांडाचा रहिवासी आहे. १५ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळील एका खाजगी एमआरआय सेंटरवर हातचालाखीने त्याने एकाचे १५ हजार रुपये चोरले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीने आरडाओरड केला तेव्हा शिवाजी नगर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथकर यांनी त्याला पकडले.
सुरुवातील त्याने आपण कोणतेही पैसे चोरले नसल्याचे सांगितले, पण पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा त्याने पत्नीकडे ठेवलेले १५ हजार रुपये काढून दिले. दरम्याम संबंधित व्यक्तीने तक्रार दिली नाही. मात्र २८ डिसेंबर २०२१ रोजी शिवाजी नगर ठाण्यात निवृत्त कर्मचारी कोंडिबा दगडू धुताडमल यांनी एका अज्ञाताविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली होती.
धुताडमल हे बँकेकडून पैसे काढून घराकडे होते, यावेळी एकाने त्यांना बसस्थानकासमोर अडवून ४० हजार रुपये लंपास केले होते. धुताडमल यांचे पैसे लंपास करणारा हा गुलाब बनसोडेच होता, हे त्याच्या चौकशीतून समोर आले आहे. सध्या त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
गुलाब बनसोडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करायचा. तो दवाखान्यापासून काही अंतरावर थांबायचा. एकट्या असणाऱ्या जेष्ठ माणसांशी तो गप्पा मारायचा ओळख काढायला आणि जवळीक वाढवायचा. तसेच त्यांना चहा पाजायचा. त्यानंतर आई दवाखान्यात आहे पैसे नाहीत, असा बहाणा करत त्यांच्याकडून पैसे उकळायचा.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! तुमची गाडी ८ वर्षे जुनी असेल तर तुम्हाला करावे लागेल ‘हे’ काम, नाहीतर होणार कारवाई
“सामान्य माणसाला ह्रदयाचे ठोके सांभाळायला जमणार नाही म्हणून..”, कपिलने असं म्हणताच लाजली माधुरी
भयानक! शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तीन शिवप्रेमींचा अपघात, २०० फुट दरीत कोसळली मोटरसायकल