Share

राज्यात लवकरच राजकीय भूकंप! ३५ वर्षे आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात खळबळ

ajit pawar sharad pawar

Beed : राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलं आहे. राजकारण मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. अशातच वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. येत्या काही दिवसांत राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यादरम्यान बीडचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंखे यांनी मोठं वक्तव्य केला आहे.

प्रकाश सोळंखे म्हणाले की, राज्यात लवकरच निवडणूक होणार आहे. त्या आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला काहीतरी चमत्कार करावा लागणार आहे. सध्या जी चर्चा सुरू आहे ते होणारच आहे. त्याबद्दल कोणीही कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका आणू नये.

तसेच, मी गेल्या १५ दिवसांपासून मुंबईला पाऊल ही ठेवले नाही. माझी कुणाशी चर्चा झाली नाही. त्यामुळे मला काय सुरू आहे याबद्दल माहिती नाही. परंतु, माझा ३५ वर्षाचा अनुभव पाहता मला असे वाटते की, लवकरच महाराष्ट्र भूकंप होईल. त्यामुळे राजकारणाचं काय होणं अपेक्षित आहे? याची मला जाण आहे. असेही प्रकाश सोळंखे यांनी सांगितले.

सोळंखे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे. बीड माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंखे यांनी बाजार समिती निवडणुकीसंदर्भात जाहीर पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय परिस्थिती विषयी मोठं वक्तव्य केल. काही दिवसांपुर्वी प्रकाश सोळंके हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरीही अध्यापहीच चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. त्याचं वेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच राजकीय वर्तुळात काहीतरी शिजत असल्याचे संकेत ही त्यांनी दिले आहेत.

गेल्या आठवड्यापासून माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाण्यास जाणार का? त्यांच्या सोबत इतर काही आमदार ही भाजपमध्ये जाणार का? अशी चर्चा सुरू होती. या चर्चेला स्वतः अजित पवार यांनी पूर्णविराम दिला. या सर्व अफवा असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या
माधुरी दीक्षितने खरेदी केली जगातील सर्वात वेगवान कार, किंमत ऐकून बसेल धक्का
मुंडे बंधू भगिनी एकत्र येण्याच्या मार्गावर; आता धनंजय मुंडेंनी पंकजांना दिले ‘हे’ जबरदस्त रिटर्न गिफ्ट  
बॉलिवूडमधील सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण? रविंद्र जडेजाने सांगीतलेल्या नावाने टीम इंडियात राडा

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now