Share

कांदा कापताना आईच्या डोळ्यातून येत होते अश्रू, ते थांबवण्यासाठी सातवीच्या ओंकारने केली स्मार्ट चाकूची निर्मिती

आई आणि मुलाचं नातं खुप वेगळं असतं. आई मुलासाठी काहीही करु शकते. मुलाला कोणता त्रास होऊ नये, त्याला सर्व गोष्टी मिळाव्या यासाठी धडपड करत असते. पण आता अशाच एका आईच्या गुणी मुलाने आपल्या आईसाठी काहीतरी भन्नाट तयार केले आहे. (beed boy make smart knife)

आईच्या डोळ्यातील अश्रू थांबावे आणि पुढे कधीच आईच्या डोळ्यात अश्रू येऊ नये म्हणून एका चिमुकल्याने एक चाकू बनवला आहे. झाले असे की कांदा चिरताना त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू येत होते, हे अश्रू त्या चिमुकल्याने पाहिले आणि ते थांबवण्यासाठीच या चिमुकल्याने हा स्मार्ट चाकू बनवला आहे.

सातवीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचे नाव ओंकार शिंदे असे आहे. हा विद्यार्थी बीडमधील कुर्ला येथे राहतो. ओंकार शिंदेने संशोधन करुन आणि आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करुन हा चाकू बनवला आहे. या अनोख्या प्रयोगाद्वारे त्याने त्याच्या आईचे कायमचेच अश्रू पुसले आहे.

सध्या या ओंकारची राज्यभरात चर्चा होत आहे. तो कुर्ल्याच्या जिल्हा परीषदेच्या शाळेत शिकतो. ओंकार शिंदे याचे आईवडिल दोघेही शेतमजूरी करतात. याच कामातून ते त्यांचे कुटूंब चालवतात. आपल्याला शिकता आले नाही म्हणून ते दोघेही कष्ट करुन ओंकारला शिकवत आहे.

ओंकारला असे नवनवीन प्रयोग करण्याची कल्पना त्याच्या शिक्षकाकडूनच मिळाली. शाळेतील शिक्षक भाऊसाहेब राणे त्यांच्या शाळेतील मुलांच्या गुणांना वाव मिळण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. यापूर्वी देखील त्यांनी विद्यार्थ्यांकडून असे अनेक प्रयोग करुन घेतले आहे. मात्र ओंकारच्या प्रयोगामुळे ते देखील चर्चेत आले आहे.

हा स्मार्ट चाकू बनवण्यासाठी त्याला फक्त दोन दिवस लागले. या चाकूचा उपयोग स्वयंपाकघरात विशेष करुन कांदा कापण्यासाठी केला जातो. तो कुठेही सहज नेता येतो. या कांद्याने कितीही कांदा कापला तरी डोळ्यात पाणी येत नाही. या चाकूचे पुढे छोटासा पंखा लावण्यात आला आहे. त्यामुळे कांद्यातून निघणारा वायू थेट आपल्या डोळ्यात जात नाही आणि यामुळे डोळ्यात पाणी येत नाही.

या प्रयोगावर ओंकारनेही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, एकेदिवशी मी घरी आलो, तेव्हा बघितले की आई कांदा कापत होती. पण तिच्या डोळ्यातून खुप अश्रू येत होते. त्यामुळे हे अश्रू थांबवण्यासाठी काहीतरी करावे असे वाटले. त्यामुळे मी याबाबत शिक्षक राणे सरांना विचारले. त्यावर त्यांनी वैज्ञानिक कारण सांगितले. त्यावरुनच मला हा स्मार्ट चाकू बनवण्याची कल्पना सुचली.

महत्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदी अर्धवट काम झालेल्या मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी उद्या येत आहेत, शरद पवारांचा टोला
कपिल देवचा ३६ वर्षांपूर्वीचा विक्रम रविंद्र जडेजाने काढला मोडून; ‘हा’ विक्रम करणारा बनला दुसरा भारतीय फलंदाज
मोठी बातमी! सोनाक्षी सिन्हा विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, वाचा संपूर्ण प्रकरण

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now