दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर सध्या खास अशी कामगिरी करताना दिसत नाहीये. वास्तविक, या मालिकेतील आतापर्यंतच्या तीनही सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरने खास अशी कामगिरी केलेली नाही.
आता माजी भारतीय खेळाडू वसीम जाफरने मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की श्रेयस अय्यरचा फ्लॉप शो असाच सुरू राहिला तर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या पुनरागमनानंतर त्याला संघाबाहेर जावे लागू शकते. वसीम जाफरने पुढे सांगितले की, विराट कोहली परतल्यानंतर नंबर-3 वर फलंदाजी करेल.
अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरच्या संघातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, असं वसीम जाफर म्हणाला. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. तर सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे या मालिकेत भारतीय संघाचा भाग नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात श्रेयस अय्यरने 27 चेंडूत 26 धावा केल्या. दुसऱ्या टी-20 मध्ये 35 चेंडूत 40 आणि तिसऱ्या सामन्यात 11 चेंडूत 14 धावा केल्या. भारतीय संघाने तिसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 179 धावा केल्या.
180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 19.1 षटकात केवळ 131 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे भारतीय संघाने हा सामना 48 धावांनी जिंकला. मात्र, या विजयानंतरही भारतीय संघ मालिकेत 1-2 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी राजकोटमध्ये होणार आहे.
हा सामना भारताला जिंकावाच लागेल. पुढील दोनही सामने भारताला जिंकावे लागतील नाहीतर ही सिरीज भारताच्या हातातून जाईल. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यात भारताचे गोलंदाज खास अशी कामगिरी करू शकले नाहीत. पण तिसऱ्या मालिकेत त्यांनी चागलं पुनरागमन केलं. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज आणि फलंदाज सध्या फॉर्ममध्ये आहेत.
महत्वाच्या बातम्या
”सदावर्तेंसारख्या बाजारूला काय कळणार पवार साहेब, त्यासाठी चांगली दृष्टी व लायकी लागते”
पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; राष्ट्रवादीचा सदाभाऊंना खोचक टोला
‘या’ भयानक आजाराला तोंड देत असताना मराठमोळी अभिनेत्री पोहोचली थेट केदारनाथला, पहा फोटो
चार दिवस ‘या’ लोकांबरोबर राहावं लागेल; मराठी अभिनेत्रीने सांगितले बॉलिवूडचे काळे सत्य