Share

एकता कपूरच्या यशामागे आहे अशोक सराफ यांचा हात, एकताने सांगितले खरे कारण…

बॉलीवूडमध्ये नाव करण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. अनेकजण यासाठी मोठी मेहनत घेतात. यामध्ये एकता कपूरचे देखील नाव लागते. बालाजी टेलिफिल्मची सर्वेसर्वा एकता कपूरने आजवर अनेक नवोदीत कलाकारांची करिअर घडवली आहेत. त्यामुळे तिला टीव्ही इंडस्ट्रीमधील ‘गॉडमदर’ असेही म्हटले जाते.

एका करिअर एका मराठी अभिनेत्यामुळे घडले होते. असे तिने एकदा सांगितले आहे. एकता आज यशाच्या शिखरावर आहे. टीव्हीच नव्हे तर वेब सीरिजमध्ये देखील ती घवघवीत यश मिळवत आहे. परंतु याची सुरुवात झाली होती ती एका मराठी अभिनेत्यामुळे झाली. अनेकांना हे खोटे वाटेल पण हे खरे आहे.

एकताने १९९५ मध्ये करिअरची सुरुवात केली होती. मात्र सुरुवातीच्या तिच्या तिनही मालिकेत तिला यश मिळाले नाही. या मालिका फसल्या. सलग तीन फ्लॉप मालिका दिल्यामुळे कोणताच निर्माता तिच्यावर पैसे गुंतवायला तयार नव्हता. वडील जितेंद्र यांनी देखील निर्मितीचा नाद सोड आणि अभिनय वगैरे कर असा सल्ला तिला दिला होता.

परंतु एकताने एक विनोदी मालिका तयार करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावेळी मराठी सुपरस्टार अशोक सराफ यांनी तिची मदत केली होती. एकताने ‘हम पांच’ नावाची मालिका तयार केली. या मालिकेत अशोक सराफ यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. ही मालिका चालेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अशोक सराफ यांची लोकप्रियता आणि धम्माल विनोद करण्याची शैली यामुळे ‘हम पांच’ सुपरहिट ठरली. अनेकदा मालिकेतील संभाषण हे सुमार दर्जाचे असायचे परंतु अशोक सराफ यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याचे विनोदात रुपांतर केले. असे स्वत: एकता कपूरने सांगितले आहे.

यानंतर तिने कधी मागे वळून बघितले नाही. अनेक मालिका तिने यानंतर काढल्या. यामध्ये तिला यश मिळत गेले. मात्र तिला हे यश अशोक सराफ यांच्यामुळे मिळाले आहे, हे सांगायला ती विसरत नाही. आता तिची एक वेगळीच ओळख आहे.

महत्वाच्या बातम्या
सेक्स दरम्यान प्रसिद्ध सेलिब्रिटीसोबत घडला भयानक प्रकार, व्हावे लागले रुग्णालयात दाखल
९ रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर शेअरने दिला तब्बल ३६४० टक्के परतावा, गुंतवणूकदार मालामाल
अशोक सराफ शर्टाचे पहिले बटन नेहमी उघडे का ठेवायचे? कारण ऐकून चकीत व्हाल
IPL मध्ये यश मिळवल्यानंतर लसिथ मलिंगाला मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी, बनवणार नवीन स्ट्रॅटजी

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now