Share

१५ हजार रुपयांची गुंतवणूक करुन व्हा करोडपती, ‘हा’ भन्नाट फॉर्म्युला तुम्हाला माहितीये का?

आयुष्यात प्रत्येकालाच कोट्यधीश बनायची इच्छा असते. प्रत्येकाला असे वाटत असते की आपण अलिशान आयुष्य जगलं पाहिजे. आपलं अलिशान घरं असावं, अलिशान गाडी असावी. पण प्रत्येक व्यक्तीला कोट्यधीश बनता येत नाही. जे मेहनत करतात, स्मार्ट पद्धतीने पैशांची बचत करतात, तेच कोट्यधीश बनतात. (be a millionaire in 15 year)

कोट्यधीश बनण्यासाठी काही लोक तर चुकीच्या मार्गानेही पैसे कमवतात. पण कष्टाच्या मार्गानेही पैसे मिळवून तुम्ही कोट्यधीश बनू शकतात. फक्त कोट्यधीश बनण्यासाठी तुम्हाला संयम, मेहनत आणि स्मार्ट गुंतवणूकींची गरज असते.

आज आम्ही तुम्हाला एक असा फॉर्म्युला सांगणार आहोत, जो तुम्हाला कोट्यधीश बनवू शकतो. श्रीमंत बनण्यासाठी काही लोक काटकसरीने जगत असतात. त्यामुळे पैशांची खुप बचत होत असते. काटकसरीच्या आयुष्याने तुम्ही चांगली बचत करु शकतात आणि भविष्यात हवे तसे आपले आयुष्य जगू शकतात.

तज्ज्ञ म्हणतात. की तुम्ही शक्य तितकी बचत करायला हवी आणि लवकरात लवकर योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला हवी. चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली, तर आपल्याला परतावाही चांगला मिळतो. २० व्या वर्षांपासूनही काही तरुण बचतीला सुरुवात करतात आणि पुढे जाऊन ते श्रीमंत होतात.

तुम्ही तुमचा पगार कसा खर्च करता, त्यापेक्षा तुम्ही तो कसा जमा करतात आणि तो कसा गुंतवतात यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. असे म्हणतात कोट्यधीश होण्यासाठी १५-१५-१५ चा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतात. या फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्हीही कोट्यधीश होऊ शकतात.

१५ वर्षांसाठी दरमहा १५ हजार रुपये गुंतवा. त्याच्या माध्यमातून तुम्ही १ कोटींचे लक्ष सहज गाठू शकतात. १५ वर्षांसाठी तुम्ही दरमहिन्याला १५ हजार रुपये गुंतवा, तसेच त्याच्यावर तुम्हाला वार्षिक १५ टक्के व्याज मिळाले, तर तुम्ही १ कोटींचे लक्ष्य गाठू शकतात.

तसेच वैद्यकीय विमा घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय आणि जीवन विमा जितका लवकर घेतला जाईल, तितके चांगले असते. कारण यामुळे तुम्हाला अचानक कुठून पैसे आणण्याची गरज भासत नाही. विमा कंपनी तुम्हाला पैसे पुरवत असते. त्यामुळे तुम्ही जर विमा घेतला असेल आणि कुटुंबातील सदस्याला अचानक रुग्णालयात दाखल केले तर तुम्हाला लगेच पैसे मिळतात.

महत्वाच्या बातम्या-
”धनंजय मुंडेंचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध, सिडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल”
भूल भुलैया 2 चं मोठं गुपित झालं उघड, चित्रपट पाहणार असाल तर चुकूनही वाचून नका ही बातमी
लहाणपणीच्या मैत्रिणीसोबत केलं लग्न, ६ वी पासून होते एकत्र; सात जन्माचे नाते मध्येच तोडून गेले केके

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now