Cricket : टी २० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. त्यामुळे भारतीय संघाचे टी २० वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून (BCCI )चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ खुपच निराशाजनक कामगिरी करताना दिसून येत आहे. त्यामुळे बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या खराब कामगिरीसोबतच संघातील सदस्यांसोबतही निवड समितीचे वाद होत होते. बीसीसीआयने वर्ल्डकप २०२४च्या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.
अशात वर्ल्डकप झाल्यानंतर बीसीसीआयने संपूर्ण समितीचं बरखास्त केली आहे. त्यामुळे आता अनेक मुद्दे समोर आले आहे. टी २० संघाचे कर्णधारपद नव्या खेळाडूकडे सोपवण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षक पदासाठी राहुल द्रविडच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तर बीसीसीआय लवकर राहुल द्रविड सोबत चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, टी २० संघासाठी नवीन कर्णधार निवडण्याबाबत आम्ही रोहित शर्मासोबत चर्चा केली आहे. रोहितला याबाबत कोणतीही हरकत नाही. अशीच चर्चा आता राहुलसोबत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता आम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही, असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
दरम्यान, इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून पराभव पत्करावा लागल्याने भारताला स्पर्धेतून बाहेर फेकावे लागले. चेतन शर्मा गेल्यानंतर त्यांच्या खुर्चीवर कोण बसणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याला उत्तर म्हणून सध्या माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचे नाव या शर्यतीत आघाडीवर दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या –






