अजित आगरकरवर BCCI सोपवणार महत्वाची जबाबदारी; महाराष्ट्राला मिळणार मोठा बहुमान

Cricket: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही बदल होतील हे सर्वांनाच माहीत होते. पण इतक्या लवकर हे घडेल असे कोणाला वाटत नव्हते. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा इंग्लंडकडून उपांत्य फेरीत पराभव झाल्यापासून निवड समिती चौकशीत आहे. शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी बीसीसीआयने संपूर्ण निवड समिती बरखास्त करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला.

शुक्रवारी संध्याकाळी बीसीसीआयने अचानक नवीन निवड समितीसाठी अर्ज मागवल्याची माहिती शेअर केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. टी-२० विश्वचषकात टीम इंडियाच्या पराभवानंतर निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे बोर्डाने चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीला बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.

इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून पराभव पत्करावा लागल्याने भारताला स्पर्धेतून बाहेर फेकावे लागले. चेतन शर्मा गेल्यानंतर त्यांच्या खुर्चीवर कोण बसणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याला उत्तर म्हणून दोन नावे समोर येत आहेत. या पदासाठी दोन्ही माजी भारतीय गोलंदाजांनी गेल्या वेळी अर्ज केला होता. पण शेवटी चेतन शर्मा विजयी झाले.

सध्या माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचे नाव या शर्यतीत आघाडीवर दिसत आहे. यानंतर माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन हेही या पदाचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की, आतापर्यंत आम्ही अजितशी याबद्दल बोललो नाही. त्याला आयपीएलमधील आपली भूमिका सोडून अध्यक्ष पदासाठी अर्ज करायचा आहे. हा पूर्णपणे त्याचा निर्णय असेल.

तसेच, गेल्या वेळी हे पद मिळवण्याच्या आगरकरांनी प्रयत्न केला होता. त्यांना या ठिकाणी पाहून आम्हाला खूप आनंद होईल. त्यांना भरपूर अनुभव आहे. आयपीएल व्यतिरिक्त ते तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्यांचे योगदान खूप महत्वाचे असेल, असेही सांगितले जात आहे.

निवड समितीच्या अर्जदारासाठी बीसीसीआयने काही अटी ठेवल्या आहेत. निवड समितीचा भाग होण्यासाठी किंवा मुख्य अध्यक्ष होण्यासाठी त्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. या अटींची पुर्ण न करणाऱ्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळणार नाही.

महत्वाच्या बातम्या –